Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'मध्ये असतानाच दीपाली सय्यदच्या घरात घडली दुर्दैवी घटना, पती अन् मुलाने सांगितलं नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:45 IST

दीपाली सय्यदच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, पती अन् मुलाने दिली माहिती

Deepali Sayyed: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नुकताच दीपाली सय्यद आणि तिच्या पतीने लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एक दु:खद प्रसंग सांगितला.अभिनेत्री, राजकारणी दीपाली सय्यद सहभागी झाली आहे.  यंदाचं बिग बॉस मराठीचं पर्व ११ जानेवारीला सुरु झालं. या शोमध्ये पहिली एन्ट्री घेणारी सदस्य दीपाली सय्यद होती. एकदा स्पर्धक या शोमध्ये सहभागी झाली की त्याचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नसतो. अशातच बिग बॉसच्या घरात चांगला गेम खेळत असताना दीपली सय्यदच्या घरी दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

यावेळी दीपालीचे पती म्हणाले, "हल्लीच माझी आई वारली आणि ती दीपालीच्या खूप जवळची होती. ती दीपालीला मुलगीच मानायची. माझी आई नेहमी म्हणायची, तू बिग बॉस जिंकल्यावर मी नक्की येईन. आम्ही तिला नाही सांगितलं कारण, ती खूप चांगलं खेळतेय. खेळासोबतच जे झालं ते झालं. माझ्या आईला नेहमीच दीपालीची साथ लागायची. डॉक्टरकडे जायचं असेल तर ती दीपालीलाच घेऊन जायची."

यापुढे ते म्हणाले," म्हणूनच आता मी तिला मिस करतोय, कारण सगळे निर्णय मलाच घ्यावे लागतायत. माझी आई २ फेब्रुवारीला वारली, म्हणून आम्ही दीपालीला सांगितलं नाही. तिला हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल. जेव्हा आई शेवटी शेवटी काही बोलायची नाही, तेव्हा मी तिला दीपालीचा आवाज ऐकवायचो. आम्हाला नव्हतं वाटलं, कारण दोनवेळा आई ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि आई आलेली परत. यावेळी पण असंच वाटलेलं, म्हणून मी नाही सांगितलं. दीपालीने कायम पुढे जावं अशी माझ्या आईची इच्छा होती." 

दिपालीच्या सासुचे २ फेब्रुवारी रोजी निधन झाले.  या वेळात दिपाली बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉसच्या घरात जाताना तिने सासूला ट्रॉफी घेऊन आले की भेटू सांगितले होते. दीपालीचा गेम चांगला सुरू आहे आणि जर तिच्या पर्यंत ही दुःखद बातमी पोहचली तर ती खचून जाईल आणि बाहेर यायला बघेल. तिने बघितलेले स्वप्न अर्धवट राहील म्हणून दिपाली यांच्या सासूच्या निधनाची बातमी घरच्यांनी बिग बॉसच्या घरात दिपाली पर्यंत पोहचू दिली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy struck Deepali Sayyed's home during Bigg Boss; family hid it.

Web Summary : While Deepali Sayyed is in Bigg Boss, her grandmother passed away. Her family hid the news to avoid impacting her game, fulfilling the grandmother's wish for Deepali's success.
टॅग्स :दीपाली सय्यदबिग बॉस मराठी ६मराठी अभिनेतासेलिब्रिटी