'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचलेला सागर कारंडे सध्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याच्या खेळापेक्षा सागर कारंडेच्या एका व्हायरल व्हिडिओचीच जास्त चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत सागर चक्क तंबाखू मळताना आणि खाताना दिसल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. या एका व्हिडीओमुळे शोच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 'बिग बॉस'च्या घरात व्यसन करायला अधिकृत परवानगी असते का? सिगारेट आणि ड्रिंक्सबाबत या घराचे नियम काय आहेत? असे प्रश्न चाहत्यांना पडले. यावर आता खुद्द शोचे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सागर कारंडेच्या त्या व्हायरल व्हिडीओबद्दल बोलताना केतन माणगावकर म्हणाले, "सागरचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय, तो जर तुम्ही नीट पाहिला तर लक्षात येईल की सागर पाठमोरा उभा आहे, तो तिथे दिग्गज अभिनेते निळू फुले यांची नक्कल करत आहे. सागर आणि राधा यांच्यात एक गमतीशीर स्किट चाललं होतं. 'बाई आम्हाला तुमचा शो करायचा आहे, किती पैसे घेणार?' ती बोलली "काय, मग" यावर 'दोन चपात्या देतो' असा त्यांचा जोक सुरू होता. तो तंबाखू खात नव्हता. नॅशनल टेलिव्हिजनवर अशी कोणतीही गोष्ट दाखवली जात नाही, हे सर्वांना ठाऊक आहे". सकाळ प्रीमिअरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.
'बिग बॉस'च्या घरातील इतर व्यसनांबाबत असलेल्या नियमांची माहिती देत केतन यांनी सांगितले की, शोच्या फॉरमॅटनुसार घरात एक 'स्मोकिंग झोन' असतो. स्पर्धक स्मोकिंग झोनच्या आत जाऊन सिगारेट ओढू शकतात, मात्र बाहेर येऊन धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. तसेच, हे दृश्य टीव्हीवर दाखवले जात नाही. बिग बॉसच्या घरात मद्यपानाला अजिबात परवानगी नाही. सिगारेटशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन तिथे चालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Creative head clarifies Sagar Karande wasn't eating tobacco in Bigg Boss. He was mimicking Nilu Phule. Smoking allowed only in designated zone; alcohol prohibited.
Web Summary : क्रिएटिव हेड ने स्पष्ट किया कि सागर कारंडे बिग बॉस में तंबाकू नहीं खा रहे थे। वे नीलू फुले की नकल कर रहे थे। धूम्रपान केवल निर्दिष्ट क्षेत्र में अनुमत; शराब प्रतिबंधित है।