Bigg Boss Marathi 6 Contestants: महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार, आपला 'भाऊ' अर्थात अभिनेता रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व घेऊन येत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील स्पर्धकांची चर्चाही रंगली आहे. आता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील दोन स्पर्धक समोर आले आहेत. कलर्स मराठीनं शेअर केलेल्या प्रोमोनुसार एक 'नखरेल गर्ल' आणि दुसरी आहे 'कातिलों की कातिल' 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेणार आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन 'बिग बॉस मराठी ६' मधील स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ती 'हाय गर्मी' या गाण्यावर एक धमाकेदार डान्स करताना दिसते आहे. मात्र एकाही फ्रेममध्ये तिचा चेहरा दिसलेला नाही. पण, नेटकऱ्यांनी तिच्या कंबरेवरील टॅटू पाहून ती सोनाली राऊत असल्याचं म्हटलं आहे. सोनाली राऊत ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं याआधी 'बिग बॉस ८' हिंदी शोदेखील केला आहे. तसेच 'ग्रेट ग्रँड मस्ती' आणि 'द एक्सपोज' या चित्रपटात काम केले आहे.
कलर्स मराठीनं शेअर केलेल्या आणखी एका प्रोमोमध्ये एका नृत्यांगनाची झलक दिसतेय. 'गरगर गिरक्या घेत घायाळ करायला येतेय कातिलों की कातिल...' असे म्हणत कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला. आता 'कातिल' हा शब्द वाचल्यावर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये ही गौतमी पाटील असल्याचे म्हटले आहे. मात्र गौतमीने स्पष्ट केलेले की ती या शोमध्ये सहभागी होणार नाही आहे. त्यामुळे तिच्या नृत्याची स्टाईल आणि प्रोमोमधील झलक पाहून काही नेटकऱ्यांनी ही प्रसिद्ध नृत्यांगना राधिका पाटील असल्याचा ठाम अंदाज वर्तवला आहे. या प्रोमोवर बहुतांश युजर्सनी राधिकाला टॅग सुद्धा केलं आहे.
आता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेणाऱ्या या दोघी नक्की कोण आहेत, ते येत्या रविवारी कळेल. 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व ११ जानेवारीपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ६' पाहता येणार आहे. रितेशला पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत.
Web Summary : Bigg Boss Marathi 6 teases two contestants: a 'naughty girl' possibly Sonali Raut, and a dancer, speculated to be Radhika Patil, though Gautami Patil denies involvement. Official reveal coming soon.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 दो प्रतियोगियों को दिखाता है: एक 'नटखट लड़की' संभवतः सोनाली राउत, और एक नर्तकी, जिनके राधिका पाटिल होने का अनुमान है, हालांकि गौतमी पाटिल ने इनकार किया है। आधिकारिक खुलासा जल्द ही।