Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातारा आणि कोल्हापूर आमनेसामने! अनुश्री माने-रुचिता जामदार कोण कोणावर भारी पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:09 IST

'बिग बॉस मराठी ६' मध्ये सातारची अनुश्री माने आणि कोल्हापूरची रुचिता जामदार यांची एन्ट्री झाली आहे.

'बिग बॉस मराठी ६' मध्ये एकापाठोपाठ एक धमाकेदार एन्ट्री होत आहेत. साताऱ्याची अनुश्री माने आणि कोल्हापूरची रुचिता जामदार या दोघींनी 'बिग बॉस'च्या घरात पाऊल ठेवले आहे. या दोन ग्लॅमरस स्पर्धकांच्या एन्ट्रीमुळे घरातील चुरस आता अधिकच वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

रुचिता तिच्या बेधडक स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. मंचावर रितेश देशमुखशी गप्पा मारताना ती म्हणाली,  "छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरची लेक आहे. छुईमुई बाहुली नाही तर वाघिण आहे. थेट अंबाबाईचा आशिर्वाद घेऊन आले आहे. त्यामुळे यावेळेस लढायला मजा येणार आहे". तर "मुंबईत ट्रॉफी निघतेय, तर ती साताऱ्यालाचं थांबणार" असं म्हणत अनुश्री माने हिनेदेखील आपले इरादे स्पष्ट केले. 

 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड प्रीमियरमध्ये प्रत्येक स्पर्धकाला घरात जाताना दोन पर्याय दिले जात आहेत. 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करताना मेहनत आणि शॉर्टकट या पर्यायापैकी रुचितानं शॉर्टकट हा दरवाजा निवडला. तर अनुश्रीनं मेहनतीच दार निवडलंय.

अनुश्री माने ही सोशल मीडियावरील एक अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. तिचे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओ तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत. तर रुचिता एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे, विशेषतः आपल्या डान्ससाठी ती चाहत्यांमध्ये ओळखली जाते.आता 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापुरी बाणा आणि सातारचा ठसका यांची जुगलबंदी  पाहायला मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara vs. Kolhapur in Bigg Boss Marathi: Who will win?

Web Summary : Anushri Mane from Satara and Ruchita Jamdar from Kolhapur have entered Bigg Boss Marathi 6, intensifying the competition. Ruchita is known for her outspoken nature, while Anushri is a social media sensation. It will be interesting to see who will win.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६