Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतचा 'खेळ' खल्लास? बिग बॉसने सुरक्षा रक्षकांना बोलावून घराबाहेर काढलं? पाहा मजेशीर प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:45 IST

'बिग बॉस मराठी ६' हा शो कलर्स मराठी वाहिनीवर दररोज संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळेल.

'ड्रामा क्वीन' राखी सावंत 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात आली आहे.  पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची घरात एन्ट्री झाली. घरात एन्ट्री घेतल्यापासून राखी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसून येत आहे. राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ आहे. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखीवर बिग बॉसकडून कडक कारवाई केल्याचं पाहायला मिळालंय. प्रोमोमध्ये राखीला ज्या पद्धतीने खेचत बाहेर नेलं जातंय, ते पाहून प्रेक्षकही थक्क झालेत.

प्रोमोमध्ये दिसतंय की घरातील सदस्य आणि राखी सावंत गार्डन एरियामध्ये बसले आहेत. यावेळी 'बिग बॉस' राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावतात. राखीने बिग बॉसच्या घरात बरीच तोडफोड केलेली. अनेक गोष्टींची नासाडी केलेली, त्यामुळे बिग बॉस तिच्यावर नाराज होतात. 'बिग बॉस' तिला म्हणतात की, "या घराची जी अवस्था आहे, आता आम्ही तुमच्या विरोधात कठोर पावले उचलणार आहोत". मग ते काही माणसांना घरात पाठवतात आणि राखीला खेचत बाहेर नेताना दिसतात. या प्रोमोवरून राखी सावंतचा प्रवास इथेच संपला का? की यामध्येही काहीतरी ट्विस्ट आहे, हे आज रात्रीच्या एपिसोडमध्ये कळेल.

'बिग बॉस मराठी ६' हा शो कलर्स मराठी वाहिनीवर दररोज संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळेल. दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६'च्या पर्वाचा पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला. काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर अनपेक्षित एलिमिनेशन पाहायला मिळाले. करण सोनावणे आणि आयुष संजीव या दोन स्पर्धकांना एकत्र घराचा निरोप घ्यावा लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rakhi Sawant evicted from Bigg Boss Marathi? Promo sparks speculation.

Web Summary : Drama Queen Rakhi Sawant's Bigg Boss journey faces a shocking twist. Due to damages, Bigg Boss punishes Rakhi and has her forcefully removed from the house. Is this the end, or is there more to the story? Find out tonight!
टॅग्स :बिग बॉस मराठी ६