Join us

Bigg Boss Marathi 5 : वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार हिंदुस्थानी भाऊ? 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:33 IST

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :लवकरच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी भाऊ बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचं बोललं जात आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग ब़ॉस मराठीचा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत बरेच सरप्राइज यंदाच्या सीझनमध्ये चाहत्यांना मिळाले. दिग्गज कलाकारांपासून ते रीलस्टारपर्यंत असे स्पर्धक या पाचव्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळत आहेत. आता लवकरच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 

बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आता कोणता नवा चेहरा घरात पाहायला मिळणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. अनेक नावांची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. Rj सुमीत पाटील बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा रंगली होती. आता सोशल मीडिया स्टार हिंदुस्थानी भाऊ बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

हिंदुस्थानी भाऊला बिग बॉस मराठीच्या टीमकडून वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी विचारणा झाल्याचं समजत आहे. याआधी हिंदी बिग बॉसमध्ये तो दिसला होता. बिग बॉस १३ मध्ये तो सहभागी झाला होता. हिंदुस्थानी भाऊने त्याच्या स्टाइलने बिग बॉसचं घर दणाणून सोडलं होतं. आता तो बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार का? हे पाहावं लागेल. हिंदुस्थानी भाऊने घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली तर मात्र घरातील समीकरणं पुन्हा बदललेली पाहायला मिळणार आहेत. 

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यातील कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. यासाठी सदस्यांना नवा टास्क देण्यात आला आहे. दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी कार्यात विजयी होत अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला होता. आता यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी योगिता चव्हाण, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, सूरज चव्हाण या सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार