Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच मोठा राडा! अंकिता-निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की, प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 08:56 IST

बिग बॉसच्या घरात पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच कोकण हार्टेड गर्ल आणि निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी'चा नवीन सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेले दोन दिवस घरातील सदस्य हळूहळू घरात रुळताना दिसत आहेत. अशातच आज तिसऱ्या दिवशी घरात मोठा राडा झालेला पाहायला मिळणार आहे. घरातील पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच निक्की तांबोळी आणि कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू-वालावलकरमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाला.

पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये राडा

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील आऊट झाला आहे. 'नॉमिनेशनची तोफ' असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. अंकिताने निक्कीला उचललं आणि तिला चिडवलं. पुढे धक्काबुक्की झाल्याने दोघींनी एकमेकांवर राग काढला.

सदस्य टास्क कसा पूर्ण करणार?

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. याशिवाय अंकिता-निक्कीमधला वाद विकोपाला जाणार का, हेही सर्वांना पाहायलं मिळेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठीरितेश देशमुखकलर्स मराठी