Join us

Bigg Boss Marathi 4: एकच 'फाइट' अन् वातावरण टाइट! 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात आजवरचा सर्वात उंच स्पर्धक दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 21:47 IST

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनला आजपासून सुरुवात झाली आहे. बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत यंदाच्या सीझनचे स्पर्धक एकामागोमाग एक घरात दाखल होत आहेत.

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनला आजपासून सुरुवात झाली आहे. बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत यंदाच्या सीझनचे स्पर्धक एकामागोमाग एक घरात दाखल होत आहेत. आतापर्यंत घरात दाखल झालेल्या स्पर्धकांपैकी एका हटके स्पर्धकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कारण हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझनमधील सर्वात उंच स्पर्धक ठरला आहे. 

एकच कल्ला! 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या सीझनचे 'हे' आहेत पहिले ६ दमदार स्पर्धक

मूळचा अकलूजचा योगेश जाधव 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये दाखल झाला आहे. योगेश एक फायटर असून तो अवघ्या २२ वर्षांचा आहे. पण त्याची उंची आणि ताकद पाहून घरातील सर्वच स्पर्धक भारावले आहेत. योगेश जाधव एक फायटर असून त्यानं महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. जेंटल जाएंट म्हणून योगेश जाधवला ओळखलं जातं. योगेश पाहताच महेश मांजरेकर देखील त्याची उंची पाहून थक्क झालं आणि बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात उंच स्पर्धक म्हणून त्याचा उल्लेख केला. आता हाच योगेश जाधव बिग बॉसच्या घरात किती उंची गाठतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी