Join us

Bigg Boss Marathi 4: अखेर आज संपणार चाहत्यांची प्रतीक्षा!, बिग बॉस मराठीचे चौथे पर्व भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 06:00 IST

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीचा चौथा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझन(Bigg Boss Marathi 4)ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. त्यात यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करणार आहेत. त्यानंतर हा शो कधी भेटीला येणार आणि यात कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. दरम्यान आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बिग बॉसमधील स्पर्धक कधी एकमेकांना साथ देतात तर कधी टास्कमध्ये फेल होतात, पण बिग बॉस मराठीच्या घरात यंदा सगळे ऑल इज वेल... असणार आहे. बिग बॉस मराठीचा ग्रॅण्ड प्रीमियर आज संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री १० वा, शनिवार, रविवारी रात्री ९.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर एपिसोड पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अपूर्वा नेमळेकर, अन्विता फलटणकर, हार्दिक जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षकांची शोची प्रतीक्षा संपली असली तरी कोणकोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार, हे पाहणे औत्सुकतेचं ठरणार आहे. 
टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर