Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरातील या सदस्याला राखी सावंत म्हणतेय तिचा नवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 11:44 IST

Bigg Boss Marathi 4 : राखीच्या वागण्यामुळे घरातील या सदस्याची घाबरगुंडी उडाली आहे.

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात काल भरलेल्या BB High School मध्ये प्रसादने केलेल्या मिमिक्रीमुळे उडाला मनोरंजनाचा बार... तर अक्षय - प्रसाद मध्ये झाला जोरदार राडा. एका व्यक्तीने काल बिग बॉस मराठीच्या घरातील इतर सदस्यांचे कालपासून जगणे मुश्किल केले आहे... कालपासून राखीने घरात धुडगूस घातला आहे. राखीच्या वागण्यामुळे विकासची घाबरगुंडी उडाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी विकासला तिचा नवरा आहे असे सांगते आहे...

 राखी विकासला म्हणाली, याचं नावं राजू आहे, हा माझा नवरा आहे... राखीच्या वागणुकीला बघून किरण माने विकासला म्हणाले, तिच्या अंगात काहीतरी आलंय... राखीने विकासला विचारले, तुला माझं भयानक रूप बघायचे आहे का ? मी तुला सोडणार नाही.

यापूर्वी राखी सावंत प्रसादसोबत फ्लर्ट करताना दिसली होती. त्यावेळी राखी बोलता बोलता प्रसादकडे गेली आणि प्रसादने राखीची माफी मागितली. प्रसाद म्हणाला होता, माझी आई... राखी मी तुझ्या पाया पडतो... मला माफ कर.  त्यावर राखी प्रसादला म्हणताना दिसली की, काय झालं तुझ्या हृदयात? धकधक करने लगा क्या? अक्षय म्हणाला, त्याच्या हृदयातला घोडा धावायला लागला बघ... प्रसाद म्हणाला, आज दहन करणारच आहे मी ... अमृता देशमुख म्हणाली, कितना अच्छा मौका था यार... प्रसाद म्हणाला, हिच्या अंगावर पड... राखी म्हणाली, मी मुलींच्या अंगावर नाही पडत.

राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात आणखी काय काय धमालमस्ती करणार आहे, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

 

टॅग्स :बिग बॉस मराठीराखी सावंत