Join us

Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा नेमळेकरला कोसळलं रडू, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:06 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल त्रिशूल मराठेला घराबाहेर पडावे लागले.

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल त्रिशूल मराठे(Trishul Marathe)ला घराबाहेर पडावे लागले. आज त्याच्याविषयी अपूर्वा (Apurva Nemlekar) आणि अक्षय चर्चा करताना दिसणार आहेत. अपूर्वा अक्षयला त्रिशूलविषयी काही गोष्टी सांगताना दिसणार आहे आणि तेच सांगताना तिला अश्रू अनावर झाले.

 "त्याच्याबरोबर ना एक वेगळी बॉण्डिंग होती” अपूर्वा अक्षयला सांगताना दिसणार आहे. अक्षयचे म्हणणे आहे, "त्रिशूल हक्काचा व्यक्ती होता." अपूर्वा म्हणाली, "हो हक्काचा एक व्यक्ती यार. मी त्याचं वाक्य कधीच नाही विसरणार, तो मला काय म्हणाला धोंगडे तुझ्याबाबतीत असं बोली ना नेक्स्ट डे मी तिच्याशी बोलायला गेलो मी तिला सांगितलं तू चुकते आहेस तू एकदा अपूर्वाला जाणून घे ती तशी नाहीये जशी तुला दिसते आहे... ती वाटते तशी. पण, तिच्याशी बोलायला लागशील ना तेव्हा तुला लक्षात येईल she is a funny person. आणि हे ना नकळतपणे तो माझ्याविषयी बोलत होता आणि मला ते इतकं भारी वाटतं होतं. असं कोणीच नाही बोल आहे माझ्याशी. मला आता खूप एकटं वाटतं आहे.” अक्षय म्हणाला, “एकटं नाही वाटून घ्यायचं मी आहे ना अजून. अपूर्वा म्हणाली, इथे खूप hatred आहे माझ्यासाठी...”

आज कळेल की, अपूर्वा आणि अक्षयमध्ये किती चर्चा रंगली. हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवारी आणि रात्री ९.३० वाजता पाहावे लागेल.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकरबिग बॉस मराठी