Join us  

Bigg Boss Marathi 3: 'सांभाळून बोलायचं म्हणून...'; तृप्ती देसाईंनी दिला विकासला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 2:00 PM

Bigg boss marathi 3 : दिवसेंदिवस टास्क कठीण होत जाणार व घरातील एक-एक करुन स्पर्धक बाहेर जाणार यावरही ते चर्चा करणार आहेत. 

ठळक मुद्देविकासने हातमिळवणीसाठी घेतला पुढाकार

बिग बॉस मराठीचं (Bigg boss marathi)  तिसरं पर्व हळूहळू लोकप्रिय होताना दिसत आहे. यंदाचं पर्व सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांमधून बऱ्याचवेळा नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता घरात रंगणारे टास्क आणि सदस्यांमधील स्पर्धा यामुळे हे पर्व लोकप्रिय होत आहे. घरात सध्या स्पर्धकांचे दोन गट झाले असून या दोन्ही गटांमध्ये दररोज वाद रंगतात. परंतु, या दोन्ही वेगवेगळ्या गटातील तृप्ती देसाई ( trupti desai) आणि विकास पाटील (vikas patil) एकत्र येऊन चर्चा करताना दिसणार आहेत. 

सध्या घरात  उत्कर्ष, मीरा, गायत्री, जय, स्नेहा, दादूस आणि तृप्ती देसाई या सात जणांचा एक ग्रुप आहे. तर दुसरीकडे विकास, विशाल, आविष्कार, मीनल, सोनाली आणि आदिश या सहा जणांचा ग्रुप आहे. पण या सगळ्यात कुठेतरी स्नेहा, तृप्ती देसाई आणि दादूस यांचं बॉंडिंग सगळ्यात जास्त चांगलं आहे. विशेष म्हणजे याच गटातील संख्येवरुन तृप्ती देसाई आणि विकास चर्चा करणार आहेत. इतकंच नाही तर दिवसेंदिवस टास्क कठीण होत जाणार व घरातील एक-एक करुन स्पर्धक बाहेर जाणार यावरही ते चर्चा करणार आहेत. 

 "मग लागेल आता नंबर लवकरच. बघूया, जमलं तर आम्ही लवकरच बघू. कारण एका मतानेच कधीही फरक पडणार.. कितीही कमी झाले तरी. बरोबर ना ?आता घरात १३ जण आहेत, मग १२ होतील. म्हणजे दोन्ही मध्ये ६- ६... आता यामध्ये एक मत कुठे जाणार यावरच असणार ना ? एका मतावर गेम असतो", असं तृप्ती देसाई म्हणतात. त्यावर "आणि ते तुमचं असणार आहे...  बघूया... विचार करा... ", असं विकास म्हणतो.

दरम्यान, “सांभाळून बोलायचं म्हणून...” असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर विकास लगेच हातमिळवणी करण्यासाठी पुढाकार घेतो. मात्र, तृप्ती देसाई त्यावर नकार देतात. म्हणूनच, आता येत्या पुढील भागात कोणत्या टीममधील सदस्याला घराबाहेर पडावं लागेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीतृप्ती देसाईटेलिव्हिजन