Join us

Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस’पेक्षाही चलाख आहे घरातील हा सदस्य, ओळखा पाहू कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 11:38 IST

Bigg Boss Marathi 3 : मीरा अन् गायत्रीच्या ‘गेम’मध्ये दादूस अडकला, पाहा व्हिडीओ

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) अपेक्षेनुसार गाजतो आहे. गेम शो म्हटल्यानंतर सर्वजण चलाखीनेच खेळणार. कधी स्पर्धकांची ही चलाखी स्पष्टपणे दिसते तर कधीकधी ती समजायला जरा वेळ लागतो. आता या गायत्री (Gayatri Datar)आणि मीराचं (Mira Jagannath) बघा ना. दादूसला (Dadus ) त्यांनी गप्पागप्पात असं काही संकटात टाकलं की, तो सुद्धा चकीत झाला. होय,अगदी मीरा आणि गायत्रीची चलाखी पाहून तुम तो बिग बॉस से भी चलाख निकले, असं दादूस म्हणतो.तर गायत्री आणि मीरा दादूला गाठून त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. गप्पा सुरू असताना अचानक मीराला एक गेम सुचतो. या गेमचं नाव काय तर ‘ choices ’. तुम्ही खेळणार का? असं मीरा दादूसला विचारते. तुम्हाला दोन पैकी एकाची निवड करायची. तुम्हाला दोनपैकी काय अधिक आवडतं, ते सांगायचंय, असंही ती सांगते.

दादूस गेम खेळायला तयार होतात आणि गुलाबजाम की रसमलाई, असा मीरा पहिला प्रश्न विचारते. यावर दादूस गुलाबजाम असं उत्तर देतात. यानंतर गायत्री की सोनाली? असा प्रश्न मीरा करते. यावर दादूस सोनाली, असं उत्तर देतात. मीरा की स्रेहा यावर दादूस स्रेहाचं नाव घेतो. उत्कर्ष की जय? यातून दादूस उत्कर्षच्या नावाचा पर्याय निवडतात. उत्कर्ष की तृप्तीताई असा प्रश्न मीरा करते आणि दादूसला मीराच्या गेममधील चलाखी कळते. तू तो बिग बॉससे भी चालाख निकले, असं दादूस त्यावर म्हणतो.या गेममध्ये दादूस, गायत्री, मीरा तिघंही खळखळून हसताना दिसतात. मीरा आणि गायत्रीचं किती चलाखीने गेम खेळताहेत, हेही दिसतं.   

टॅग्स :बिग बॉस मराठी