Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3: 'मला 'तो' कॅप्टन झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही' – जय दुधाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 19:51 IST

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन कोण बनणार ? कोणाला मिळणार कॅप्टन्सीची दावेदारी यावरून चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन कोण बनणार ? कोणाला मिळणार कॅप्टन्सीची दावेदारी यावरून चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. याचबद्दलची चर्चा सुरू आहे सदस्यांमध्ये. जय म्हणाला, जर तो कॅप्टन झाला तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उत्कर्ष त्यावर म्हणाला, अरे प्रॉब्लेम हा आहे की...... काय आहे प्रॉब्लेम ... उत्कर्षला काय सांगायचे आहे हे आजच्या भागामध्ये कळेल.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार्‍या मासळी बाजारमध्ये आज टास्क जरी शांततेत पार पडणार असला तरीदेखील सदस्यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते आहे की, ही वादळा पूर्वीची शांतता नाही आहे ना ? सदस्यांमधील चर्चा ऐकून तुम्हांला देखील हाच प्रश्न पडणार हे नक्की!आज विशाल, विकास, मीनल मध्ये चर्चा रंगणार आहे याच विषयावरून... विशालचे म्हणणे आहे, वैयक्तिक सुरक्षा करायची म्हटलं ना भावा... जे काही चोराचोरी असेल वा इतर ते लास्टच्याच दिवशी केलेलं बरं आहे ! विकास म्हणाला, आता घुसू नका कोणी. विशाल म्हणाला, आता गेलो तर राडाच होणार. त्यावर मीनल म्हणाली, पण, जर ते आले तर ? त्यावर विशाल म्हणाला, त्यानंतर आपल्याला ते करायचेच आहे, मग तर राडा होणारच. मीनल म्हणाली तिथे लिहिले आहे क, पैसे तिजोरीमध्ये ठेवणे बंधनकारक नाहीये. तर मग आपले पैसे आपण थोडे वाटून घेऊया. पुढे विकास विशालला विचारणार आहे, काय म्हणाला जय, मी त्याच्याशी बोललो की तिकडून कोणी येणार आहे का? अशी काही गोष्ट आहे का ? तो म्हणाला आमचं मला महिती नाही, तिकडून कोणी येणार आहे की नाही अजून ठरलं नाही. माझं असं आहे की, जो डिझर्व्हिंग सदस्य आहे कॅप्टन्सीसाठी तोच येणार. 

टॅग्स :बिग बॉस मराठी