Join us

Bigg Boss Marathi 3 : 'तो डबल गेम खेळतोय', विकासने कोणाबद्दल व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:48 IST

Bigg Boss Marathi 3: आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला इच्छा माझी पुरी करा या नॉमिनेशन कार्यामध्ये वाचवले.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल इच्छा माझी पुरी करा या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना घरातील एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी बिग बॉस यांनी दिली. यानुसार सदस्यांनी त्यांना जे योग्य वाटतील अशा सदस्यांना वाचवले. ज्यामध्ये आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्याबद्दल आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. विकास, सोनाली, मीनल आणि विकास याबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. विकास बोलताना म्हणणार आहे, मी त्याला विचारलं तू आविष्कारला का सेफ केलंस ? त्याने मला काहीतरी कारण दिले. मी आता असा विचार करतो आहे त्याने आविष्कारला सेफ करण्यामागे काय कारण असेल ? सोनाली म्हणाली, “मी आताच विचारलं त्याला, जे त्याने मला फिरवून सांगितलं, की मी बाकीच्या लोकांच्या डोक्यामध्ये जाण्याची स्ट्रॅटजी होती, जेणेकरून त्यांना असं वाटावं की गृप मधील सदस्य आणि माझं नीट कम्युनिकेशन झालेलं नाहीये किंवा एकीकडे विश्वास संपादन करणार कोणी नाहीये जेणेकरून मी त्या लोकांच्या डोक्यामध्ये जाईन”. विकास त्यावर म्हणाला, “तो डबल गेम खेळतो आहे.” विशाल, सोनाली आणि मीनल यांनी देखील सहमती दाखवली. विशाल म्हणाला, “जसं टिचिंग टास्कमध्ये झालं”. आता नक्की काय घडलं, त्यांना ही चर्चा करावी असं का वाटलं ? हे आजच्या भागात समजेल.

टॅग्स :बिग बॉस मराठी