Join us

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:47 IST

Bigg Boss Marathi 3: आता घरात कोणाची एन्ट्री होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन काही दिवसांपूर्वी भेटीला आला. या सीझनला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतो आहे. हा सीझन पहिला दिवसांपासून खूप चर्चेत आला आहे. पहिल्या दिवसांपासून घरात वाद, बाचाबाची पहायला मिळाली. सुरूवातीलाच घरात दोन गट झालेले पहायला मिळाले. या शोमधून आतापर्यंत ४ जण बाहेर पडले आहेत. शिवलीला पाटील, सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे आणि आदिश वैद्य ही मंडळी घराबाहेर पडली आहेत. यात आदिश वैद्यने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. मात्र काही दिवसातच त्याला घरातून बाहेर जावे लागले. त्यानंतर आता आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. आता घरात कोणाची एन्ट्री होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. (Bigg Boss Marathi 3)

बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोत एक अभिनेत्री नाचताना दिसते आहे. मात्र या व्हिडीओत तिचा चेहरा अजिबात दिसत नाही. मात्र असे समजते आहे की, मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकेत झळकलेली अभिनेत्री नीता शेट्टी बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री करणार आहे.

याची हिंट तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिली आहे. तिने स्वतःचा फोटो शेअर करत बिग बॉसच्या लोगोमध्ये जे डोळ्याचे फेमस चित्र आहे, ते लावले आहे. यासोबत तिने 'आय एम वेटिंग' असे लिहिले आहे.

अभिनेत्री नीता शेट्टी मालिका परावतार श्री कृष्ण आणि घर की लक्ष्मी बेटियामध्ये झळकली आहे. तसेच ती गंदी बात ४ या वेबसीरिजमध्ये दिसली आहे. या सीरिजनंतर ती खूप चर्चेत आली होती. नीताने फुगे या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी