बिग बॉस मराठी (bigg boss marathi ) या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील (sonali patil).. कोल्हापुरची लवंगी मिरची असं बिरुद मिरवणाऱ्या सोनालीने या शोच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर आपला कोल्हापुरी बाणाही तिने या बिग बॉसच्या घरात जपला. त्यामुळेच आज सोशल मीडियावर तिची चर्चा होताना दिसते.
सोनाली कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे कायम ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते. बऱ्याचदा सोनाली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील किस्से, प्रसंगदेखील नेटकऱ्यांसोबत शेअर करते. मात्र, यावेळी तिने चक्क ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सोनालीचा हा फोटो प्रचंड चर्चेत आला असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. सोनालीचा हा लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. सोनाली बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकली होती. सोनाली शॉर्ट व्हिडिओसाठी प्रसिध्द असून तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीने 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.