Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3 Episodes, 7 Oct: घरात रंगणार 'फळ की निष्फळ' उपकार्य, विशालने विकासची का मागितली माफी ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 12:57 IST

आज अजून एक उपकार्य रंगणार आहे 'फळ की निष्फळ'. यामध्ये पणाला लागणार आहेत घरामधील फळे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या दुसर्‍या उपकार्यामध्ये टीम A विजयी ठरली आणि त्यामुळेच टीम B ला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता येणार नाही असे बिग बॉस यांनी जाहीर केले. काल साप्ताहिक कार्य पणाला लागले बाथरूम या उपकार्यामध्ये आज कोण विजयी ठरेल हे बघूया. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अजून एक उपकार्य रंगणार आहे फळ की निष्फळ यामध्ये पणाला लागणार आहेत घरामधील फळं. या उपकार्यातील विजयी टीममधील सदस्यांना घरातील फळं खाण्याची परवानगी असेल. टीम A की टीम B बघूया या कार्यात कोण बाजी मारणार?  आज विशाल विकासची माफी मागणार आहे. विशाल विकासला टास्कमध्ये काहीतरी बोलून गेला असावा त्यामुळे विकासला विशाल आपल्या मनातील गोष्ट सांगणार आहे. विशाल म्हणाला, “टास्क संपला भावा, टास्कचा विषय तिथेच सोड. तुला माहिती आहे मी कसा खेळतो आणि मला माहिती आहे तू कसे खेळतोस. हा गेम इथे संपला विषय इथे सुटला. आणि शेवटी दरवाजा बंद करून आपल्याला जायचे आहे हे लक्षात ठेव. जे काही मी तुला रागाने बोललो असेल मला बोलण्याची इच्छा नव्हती मी माफी मागतो. हा गेम आहे. तू खूप भारी खेळतोस. तू प्रेरणा आहेस माझं आणि मनात काही राग ठेऊ नकोस”. 

 असं काय घडलं खेळात की विशालने विकासची माफी मागितली ? काय बोलून गेला विशाल विकासला ज्याचं त्याला इतकं वाईट वाटलं आहे ? विकास विशालला माफ करेल ? कोणती टीम जिंकेल आजची उपकार्ये ? जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर पहा.

टॅग्स :बिग बॉस मराठी