Join us

Bigg Boss Marathi 3, Episodes, 24 Nov : असं काय घडलं की उत्कर्ष करतोय विशालला भडकवण्याचा प्रयत्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 13:07 IST

Bigg Boss Marathi 3: दिवसागणिक बदलत जाणारा सदस्यांचा खेळ आणि नाती, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे बदलते आणि खरं रूप प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोणाच्या विरोधात कधी जाईल ? किंवा कोणाला कधी पाठिंबा देईल हे सांगता येत नाही... दिवसागणिक बदलत जाणारा सदस्यांचा खेळ आणि नाती, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे बदलते आणि खरं स्वरूप प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. आता पुढे जाऊन सदस्यांमधील नात्यांचे कुठलं रूप आपल्याला पहायला मिळणार हे बघूया.

उत्कर्ष, जय आणि विशाल यांच्यात एक चर्चा आज रंगणार आहे. उत्कर्ष विशालला सांगताना दिसणार आहे, तू एकतर माझ्याकडे येणार किंवा जयकडे जाणार... जय तुझ्याकडे येणार किंवा मी तुझ्याकडे येणार, तीनच गोष्टी आहेत. विकास या गोष्टीत डायरेक्ट येत नाही... सपोर्टिव्ह तुला आणतो आणि मग स्वत: मागून येतो पण होतंय काय इथेच (आपल्या तिघांमध्ये) फिरत चालेल आहे सगळे. माझे म्हणणे काय आहे समजा तू नाही आलास यांनी यायला पाहिजे ना ? समज मी पण नाही गेलो तर यांनी खेळल पाहिजे ना ? समज जय नाही आला तर नाही खेळत कोणी... विषय काय होतो तिघांनीच या आणि तिघांनीच भिडा. तेच होत चालले आहे.

म्हावऱ्याला लागलाय नाद हे साप्ताहिक कार्य सुरुबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे म्हावऱ्याला लागलाय नाद हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. आणि याच कार्याच्या शेवटी मिळणार आहेत कॅप्टन्सीचे दोन उमेदवार. उमेदवारी मिळविण्यासाठी सदस्य आतापासूनच जोरदार प्रयत्नात  आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज खेळात एक ट्विस्ट येणार आहे आणि आज बिग बॉस तो सगळ्या सदस्यांना सांगणार आहेत. आणि त्यावरूनच गायत्री आणि विकासमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी