Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2- आजपर्यंत मिळाली नाही अशी शिक्षा पहिल्यांदाच स्पर्धक हिनाला मिळणार ? जाणून घ्या शिक्षा मिळण्याचं कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 11:45 IST

अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आणि या शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल खांब – खांब हा कॅप्टनसी टास्क रंगला. या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद आणि भांडण झाली शिव आणि आरोहमध्ये झालेल्या झटापटीमुळे बिग बॉस यांनी कार्यासाठी दिलेल्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले आणि त्यामुळेच हीना या टास्कची संचालिका असल्याने तिने दोघांदेखील बाद केले.आरोहचे म्हणणे होते शिवने त्याला धक्का दिला तर शिवचे म्हणणे होते असे काही झाले नाही. आरोहने शिववर तो चिटिंग करत आहे असा आरोप केला.

 

असेच काहीसे वीणा आणि किशोरी शहाणे यांच्याबाबतीत झाले. परंतु यावेळेस हीनाने बर्‍याचदा तिने घेतलेला निर्णय बदलला आणि आज बिग बॉस असे जाहीर करणार आहेत, “हीनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कॅप्टनसीच्या निर्णय प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला इम्युनिटी मिळते त्याच कार्यात केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा म्हणून बिग बॉसने  हीनाला शिक्षा दिली.

 

विशेष म्हणजे अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आणि या शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली आहे. तिच्या बहिणीचं नाव दिपाली पांचाळ असून ती देखील हिना इतकीच बोल्ड आहे. हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोतून पहायला मिळतं. हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

टॅग्स :हिना पांचाळबिग बॉस मराठी