Join us

'बिग बॉस मराठी 2' – शिवानीला कोणी मारला टोंबणा ? अभिजीत बिचुकलेंना शिवानीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:01 IST

अभिजीत केळकरचे देखील आभार मानले तो तिला बहिणी सारखे घरामध्ये वागतो. आज शिवानी अभिजीत बिचुकलेंवर थोडीशी चिडलेली दिसणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांचे पहिल्यापासूनच चांगले आहे. काल शिवानीचे वडील घरामध्ये येऊन गेले. त्यांनी देखील बिचुकलेंना सांगितले तुमचं आणि शिवानीचं टुयनिंग चांगलं आहे  तर अभिजीत केळकरचे देखील आभार मानले तो तिला बहिणी सारखे घरामध्ये वागतो. आज शिवानी अभिजीत बिचुकलेंवर थोडीशी चिडलेली दिसणार आहे. 

मुद्दा आहे कपडे सिलेक्ट करण्याचा. अभिजीत बिचुकलेंनी विणाला कपडे सिलेक्ट करायला संगीतले. आणि तिथून हा विषय सुरू झाला.  शिवानीचे म्हणणे आहे, “तुम्हाला कळत नाही का कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण तुमच्या मागे बोलते ? ती बाहेर येऊन काय बोलली माहिती आहे का तुम्हाला ? उगाच तुम्ही कशाला चांगले बनायला जाता ? त्यावर बिचुकले म्हणाले मी सांगू का काय झाले ? त्यावर शिवानी म्हणाली मी काय बोलते ते पूर्ण होऊ द्या ... “तुम्ही विणाला सांगितले ना माझे कपडे सिलेक्ट कर ती बाहेर येऊन म्हणाली, “मला इंटरेस्ट नाहीये कोणाचे कपडे सिलेक्ट करण्यात, आणि तेवढ्यात मी आले तर मला टोंबणा मारला ज्यांना असेल त्यांनी जाव”.

Bigg Boss Marathi 2 : आणि घरात सदस्यांना का झाले हसू अनावर, सविस्तर वाचा 'हा' किस्सा

अभिजीत बिचुकले परतल्याने घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे काहीतरी म्हणणे असते, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असते. अभिजीत बिचुकले स्वत:ला रिअ‍ॅलिटी किंग समजतो.  त्याचे नेहेमीच म्हणणे असते One And Only अभिजीत बिचुकले. अभिजीत बिचुकले. बिचुकलेंची घरामध्ये सुरू असलेली धम्माल मस्ती बघण्याजोगी असते. घरामध्ये सुरू असलेल्या कार्यात देखील बिचुकले यांनी गंमत आणली आहे. या कार्यानुसार बिग बॉस कधीही कोणत्याही सदस्याला स्टॅच्यू आणि रिलीझची सूचना देऊ शकतात आणि यामुळेच बिचुकले जरा अवघड परिस्थितीत अडकले आहेत.