Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:07 IST

बिग बॉसच्या घरातली टॉम बॉय नेहा चक्क विकेंडच्या डावात सालस आणि साजिऱ्या साडीमध्ये 'मुंगळा' गाण्यावर ठुमके लावताना दिसून आली.

नेहमी 'दबंग' आणि 'धाकड गर्ल' ने ओळखली जाणारी नेहा शितोळे या आठवड्यात एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली. बिग बॉसच्या घरातली टॉम बॉय नेहा चक्क विकेंडच्या डावात सालस आणि साजिऱ्या साडीमध्ये 'मुंगळा' गाण्यावर ठुमके लावताना दिसून आली. टास्क असो वा घरातला एखादा वाद असो, नेहाच्या व्यक्तिमत्वात 'मर्दानी'ची झलक ही दिसून येतेच. मात्र, गेल्या आठवड्यातील डावामध्ये तसेच नुकत्याच पार पडलेल्या विकेंडच्या भागात प्रेक्षकांना एक वेगळीच नेहा पाहायला मिळाली. 

नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आपल्या जवळच्या मैत्रिणीला सेफ करताना, तिच्या सर्व चुका विसरून स्पर्धेच्या अंतिम टप्प्यांमध्ये तिला सोबत घेऊन जाण्याची जेव्हा तिने इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिच्यातली सोज्वळ आणि भाऊक नेहा लोकांना दिसून आली. शिवाय, रक्षाबंधनच्या दिवशी नेहाने रंगबेरंगी चोळीवर घातलेली धवल रंगाची साडी तिचे व्यक्तिमत्व खुलवण्यास महत्वाची ठरली. त्यावेळी तिने हातात तिरंगा चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि अंबाड्यात गजरा माळत स्वतःचे वेगळेपण चांगल्यापद्धतीने सादर केले होते.

विकेंडच्या डावातदेखील ती याच पारंपरिक रूपात प्रेक्षकांना दिसून आली. पिवळी साडी आणि गळ्यातल्या ठसकेदार मंगळसूत्रामुळे नेहमी दबंग वाटणाऱ्या नेहाची एक वेगळीच छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर पडली आहे. नेहाच्या 'मुंगळा' डान्सने त्यात आणखीन कमाल दाखवल्यामुळे, आपली नेहा कुठेही कोणत्याही भूमिकेत एकदम फिट्ट बसते हे सिद्ध झाले आहे. 

त्यामुळे #NehaDeservesToWin या टॅगनुसार कधी राग, तर कधी मायाळू... कधी आसू तर कधी हसू अशी स्वभाव वैशिष्टे असलेली नेहा बिगबॉस मराठी सीजन २ च्या ट्रॉफीची आदर्श दावेदार आहे, असे मानण्यास हरकत नाही.

टॅग्स :बिग बॉस मराठीनेहा शितोळेमहेश मांजरेकर