Join us

Please Invite Me...! बिग बॉस फेम सपना भवनानीचे पाक पंतप्रधांनाना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 11:27 IST

सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टंट सपना भवनानी हिचे एक ट्वीट सध्या जाम चर्चेत आहे. होय, या ट्वीटमध्ये सपनाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देसपना तिच्या टॅटूसाठी ओळखली जाते. अंगभर टॅटू काढणारी सपना अलीकडे  टॅटू दाखविण्यासाठी  टॉपलेस झालेली दिसली होती.

सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टंट सपना भवनानी हिचे एक ट्वीट सध्या जाम चर्चेत आहे. होय, या ट्वीटमध्ये सपनाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना साकडे घातले आहे. इम्रान खान सर, कृपा करून, मला सिंधला बोलवा, असे तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.आता सपनाला पाकिस्तानच्या सिंध प्रांतात का जायचेय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागे एक कारण आहे. त्याचे असे आहे की, सपनाने ‘सिंधुस्तान’ नावाची एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. यासाठी तिला पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जायचे आहे. पण अद्याप तिला व्हिसा मिळालेला नाही. दोनदा व्हिसा नाकारण्यात आल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून आता तिने पाकिस्तानी पंतप्रधानांनाच साकडे घातले आहे.

‘इम्रान सर, मी भारतातील एक डॉक्युमेंट्री फिल्ममेकर आहे. मी सिंध प्रांतावर सिंधुस्तान नावाची एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. सिंधसाठी मला दोनदा व्हिसा नाकारण्यात आला. पण तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आणि शांतताप्रिय आहोत. आम्हालाही तेच हवे. कृपया मला आणि माझ्या फिल्मला सिंधला येण्याचे निमंत्रण द्या,’ असे तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

सपना भवनानीच्या या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. अनेकांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना सपनाची मदत करण्याची विनंती केली.सपना तिच्या टॅटूसाठी ओळखली जाते. अंगभर टॅटू काढणारी सपना अलीकडे  टॅटू दाखविण्यासाठी  टॉपलेस झालेली दिसली होती. अर्थात तिने पहिल्यांदा असा टॉपलेस किंवा  बोल्ड फोटो शेअर केला असे अजिबात नाही. यापूवीदेर्खील तिने असे अनेक सेमी न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करून धूम उडवून दिली होती. ‘बिग बॉस 10’ या शोमधून बाहेर पडल्यावर तिने या शोचा होस्ट सलमान खान याच्यावर नको-नको ते आरोप केले होते

टॅग्स :बिग बॉस