Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 9 winner प्रिंस नरूलाने या अभिनेत्रीसह केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:23 IST

बिग बॉस सिझन 9 चा विजेता प्रिन्स नरुलाने टीव्ही अभिनेत्री युविका चौधरीसह साखरपुडा केला आहे.खुद्द प्रिंसनेच ही आनंदाची बातमी ...

बिग बॉस सिझन 9 चा विजेता प्रिन्स नरुलाने टीव्ही अभिनेत्री युविका चौधरीसह साखरपुडा केला आहे.खुद्द प्रिंसनेच ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केली आहे.दोघेही गेल्या महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच दोघांनी साखरपुडा करत आपल्या नात्याला एख नवीन ओळख दिली आहे.मुळात  प्रिंस आणि युविका त्यांच्या अफेअरच्या होणा-या चर्चांवर कधीच आपले मत मांडले नव्हते.मात्र टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दोघांनाही एकत्र गेस्ट म्हणून बोलवले जायचे त्यावेळी त्यांची रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळायची.त्यामुळे दोघांनी कधीच आपले नाते उघडपणे जाहिर केले नसले तरीही त्यांचे प्रेमही कोणापासूनच लपून राहिले नव्हते.प्रिंसनेच ‘एन्गेज्ड’ झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाच सांगितले आहे.प्रिन्स आणि युविकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सुरेख फोटो पोस्ट करत त्यांच्या नात्याची ग्वाही देणाऱ्या अंगठ्या सर्वांनाच दाखवत याविषयीची माहिती दिली.प्रिंसने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रमंडळींकडून  त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.स्प्लिटसव्हीला,रोडीज आणि बिग बॉसचे 9वे पर्व जिंकल्यानंतर प्रिंस नरूला 'बढो बहु' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. रिअॅलिटी शोचे विजेते पद आपल्या नावावर करणारा प्रिंस नरूलाला रिअॅलिटी शोजचा किंग म्हणूनही ओळखले जाते.आपल्या कौशल्याने यश गाठणारा हा प्रिंस आता शोमुळे चर्चेत आलेला नाहीय,तर तो एका युविकाच्या प्रेमात पडल्यामुळे जास्त चर्चेत आला.हे अफेअर बाहेर कळताच याविषयी प्रिंसने सांगितले होते की,नक्कीच माझ्याविषयीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतीलच,सध्या आम्ही खूप चांगले मित्र असल्याचे त्याने सांगितले होते.सध्या प्रिंस 'बढो बहू' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.तर युविकाने अस्तित्व एक प्रेम कहानी,डर सबको लगता है,ये वादा रहा, अम्मा यासारखे काही शोज मध्ये ती झळकली असून फिर भी दिल है हिंदुस्तानी,ओम शांती ओम,याराना यासारखे काही सिनेमाही युविकाने केले आहेत.