Join us

'बिग बॉस १९'मधल्या स्पर्धकांपैकी सर्वात जास्त मानधन कोणाला मिळतं? नाव वाचून तुम्हीही व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:28 IST

'बिग बॉस १९'मध्ये एक स्पर्धक असा आहे जो सर्वांपेक्षा जास्त मानधन मिळवतोय, कोण आहे तो स्पर्धक?

बिग बॉस १९’ काल सुरु झालं. रविवारी (२४ ऑगस्ट) ‘बिग बॉस १९’चा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला. ‘बिग बॉस १९’मध्ये नवनवीन आणि विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झालं. ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी एक असा स्पर्धक आहे ज्याला सर्वांपेक्षा जास्त मानधन आहे. हा स्पर्धक गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत कार्यरत असल्याने ‘बिग बॉस १९’मध्ये सर्वात जास्त मानधन त्याला मिळणार आहे. कोण आहे हा स्पर्धक? जाणून घ्या.

‘बिग बॉस १९’मध्ये हा स्पर्धक घेतोय जास्त मानधन

‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये गौरव खन्नाचा समावेश आहे. गौरव खन्नाला या शोसाठी सर्वाधिक मानधन मिळत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर गौरव खन्नाने ‘एबीपी लाईव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत त्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “ही एक अफवा असू शकते, किंवा ही चर्चा खरीही असू शकते. पण मी अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही आणि मी कोणत्याही अभिनेत्याला, तो माणूस म्हणून कसा आहे हे त्याच्या पगारावरून ठरवत नाही.”

गौरव खन्ना पुढे म्हणाला की, “माझे लक्ष केवळ चांगली कामगिरी करण्यावर आहे. मला इतर स्पर्धकांबद्दल माहिती नाही आणि आम्ही एकमेकांशी पैशांबद्दल बोलत नाही.” गौरवने केलेल्या वक्तव्यानुसार तो ‘बिग बॉस १९’मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा व्यक्ती खरंच आहे का? याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. तरीही 'अनुपमा' मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला गौरव खन्ना ‘बिग बॉस १९’मध्ये सर्वाधिक मानधन घेत असेल तर आश्चर्य वाटायला नको.  रिपोर्टनुसार, गौरव खन्नाची एकूण संपत्ती ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोसाठी त्याला आठवड्याला सुमारे २.५ लाख रुपये मिळत होते.

 

टॅग्स :बिग बॉससलमान खानटिव्ही कलाकारटेलिव्हिजन