Join us  

प्रियांका चोप्राची बहीण मन्नाराला विकी म्हणाला Cheap! पूजा भट भडकली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 5:25 PM

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पूजा भटने मन्नारा चोप्राचे समर्थन करत तिने विकी जैनला फटकारले. 

'बिग बॉस 17' चा फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसा घरात हाय व्होल्टेज ड्रामा वाढत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बिग बॉस 17' च्या ताज्या एपिसोडमध्ये विकी जैन, मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांच्यात एक मोठा संघर्ष पाहायला मिळाला. यावर आता अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पूजा भटने प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर मन्नारा चोप्राचे समर्थन करत तिने विकी जैनला फटकारले. 

नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांना दोन टीममध्ये विभागण्यात आले. यावेळी घरातील मसाले लपवल्यावरुन मुनव्वर आणि विकी यांच्यात भांडण झाले. या भांडणात मन्नाराने मुनव्वरला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विकीने प्रियांका चोप्राची बहीण मन्नाराला Cheap असं म्हटलं. यावर पुजा भटने संताप व्यक्त केला. तिने पोस्ट करत विकीवर टीका केली. 

पुजा भटने X (ट्विटर) वर लिहलं, 'तु ज्या प्रकारे बसली आहेस ते फारच Cheap आहे', असे एका स्पर्धकाने मन्नाराला म्हटलं. पण, ती फक्त आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा सगळे प्रयत्न करुन काहीच होत नाही. तेव्हा एका महिलेवर अशा प्रकारची टीका केली जाते. आणि हे असं वागून तुम्ही स्वतःला जेंटलमॅन म्हणता. हे अजिबात योग्य नाही'.

यासोबतच पुजाने फिनाले पाहू इच्छित असलेल्या स्पर्धकांची नावे शेअर केले. अंतिम फेरीत येण्यास पात्र असलेले स्पर्धक म्हणजे अरुण, अभिषेक, मन्नारा आणि मुनव्वर आहेत, असे तिने म्हटलं. पुजा भटनेदेखील "बिग बॉस ओटीटी सीझन 2' मध्ये सहभाग घेतला होता.  दरम्यान, 'बिग बॉसच्या 17' व्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या शोमध्ये कोणते ट्वीस्ट अँड टर्न्स येणार आहेत? हे बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 

टॅग्स :पूजा भटसेलिब्रिटीबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारअंकिता लोखंडेसलमान खानबिग बॉस