Join us  

मुनव्वर फारुकी 'Bigg Boss 17' जिंकल्यावर एक्स गर्लफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 2:28 PM

मुनव्वर फारुकीनं 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यात मुनव्वर फारुकी विजेता ठरला असून अभिषेक कुमार (Abhishek Kumar) उपविजेता ठरला आहे. मुनव्वरला सर्वाधित मतं मिळाली. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  मुनव्वर फारुकीनं 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

अंकिता आणि अभिषेकला सपोर्ट करण्यासाठी आयशा खान बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली होती.  मुनव्वरच्या विजयावर आयशा म्हणाली,  'मी आनंदी आहे, जनतेची मते आहेत, कोणीही जिंको.  हे सर्व जनतेच्या मतांवर अवलंबून आहे. अभिषेकचा पराभव पाहून मला वाईट वाटलं. अभिषेक जिंकायला हवा होता. पण हरकत नाही'. पुढे अंकिताच्या पराभवावर ती म्हणाली, 'अंकिता लोखंडेच एविक्शन धक्कादायक होतं. मला अपेक्षा नव्हती. मला अंकिता या टॉप 2 मध्ये असतील असे वाटत होते. पण, ठीक आहे आता काय करु शकतो'.

बिग बॉसच्या ग्रँड फिनाले सोहळ्यात रंगत वाढवण्यासाठी टॉप 5 स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. त्यानुसार, बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर होणाऱ्या सक्सेस पार्टीत विजेता कोणत्या स्पर्धकाला बोलावणार नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मुनव्वरने एक्स गर्लफ्रेंडचं आयशाचं नाव घेतलं होतं. दरम्यान, मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशाने 'बिग बॉस 17' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती आणि मुनव्वरवर अनेक आरोप केले होते. 

. 'बिग बॉस 17'चा विजेता ठरलेल्या मुनव्वरला ट्रॉफीसह 50 लाख रुपये आणि आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे. रिअ‍ॅलिटी शो जिंकण्याची मुनव्वरची ही पहिली वेळ नव्हे, याआधी त्याने कंगना रणौतचा शो 'लॉकअप'ही जिंकला आहे.  मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायक आहे. पण, कॉन्ट्रोव्हर्सीशी मुनव्वरचं नातं नवीन नाहीये. साधारण महिन्यापेक्षा अधिक काळ त्याला तुरुंगाची हवा खाली लागली होती.  2021 मध्ये राजकीय नेत्यांवर आणि हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी   केली होती. त्यानंतर त्याला इंदोरमधून अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणामुळे त्याचं नाव चर्चेत राहिलं आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनसलमान खानटिव्ही कलाकार