Join us  

Bigg Boss 16 : हे सांगणारा तू कोण? सुम्बुलला फैलावर घेणाऱ्या सलमानवर भडकले चाहते 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 6:04 PM

Bigg Boss 16, Sumbul Touqeer Khan: गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने सुम्बुलची जबरदस्त शाळा घेतली. हे ऐकून सुम्बुल रडायला लागली. ती अगदी ढसाढसा रडली. सुम्बुलची ही अवस्था बघून तिचे फॅन्स भडकले नसतील तर नवल...

‘इमली’ फेम सुम्बुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही ‘बिग बॉस 16’ची (Bigg Boss 16) सर्वात लहान स्पर्धक. निश्चितपणे सुम्बुलची फॅन फॉलोइंग तगडी आहे. त्यामुळे गेममध्ये फार काही न करताही ती ट्विटरवर ट्रेंड होताना दिसते. अर्थात गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने (Salman Khan) याच सुम्बुलची जबरदस्त शाळा घेतली. सुम्बुल शालीनसाठी वेडी झाली असल्याचा आरोप सलमानने केला. हे ऐकून सुम्बुल रडायला लागली. ती अगदी ढसाढसा रडली. सुम्बुलची ही अवस्था बघून तिचे फॅन्स भडकले नसतील तर नवल. सध्या सुम्बुलचे चाहते जाम भडकले असून सलमान खानवर भडास काढत आहेत.सलमानने नॅशनल टीव्हीवर सुम्बुलच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तिला विनाकारण टार्गेट केलं, असं  सुम्बुलच्या चाहत्यांचं मत आहे.

शालीन भनोट व एमसी स्टॅन यांच्यात गेल्या आठवड्यात जोरदार भांडण झालं. या भांडणात सुम्बुल शालीनच्या बाजूने मैदानात उतरली. शालीनवर अधिकार गाजवून ती नुसती ओरडत होती. अगदी तिने टीना दत्ताही शालीनजवळ जाऊ दिलं नाही. तिचं हे वागंण पाहून सगळ्यांनाच काही क्षण धक्का बसला. सलमानच्याही भुवया उंचावल्या. मग काय? वीकेंड का वारमध्ये सलमानने सुम्बुलला फैलावर घेतलं. कारण पहिल्या दिवसापासूनच सुम्बुल शालीनच्या मागेपुढे फिरताना दिसतेय. सलमानने तिला अनेकदा समजावलं. पण तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झााला नाही. हे पाहून सलमान भडकला. पण सलमानचं या पद्धतीने सुम्बुलला फैलावर घेणं, चाहत्यांना आवडलं नाही.

सलमानला म्हटलं दुटप्पीएका 18 वर्षाच्या मुलीला नॅशनल टीव्हीवर यापद्धतीने फैलावर घेणं, तिच्या चारित्र्याबद्दल बोलणं, हे योग्य नाही. सलमान आपलं मत तिच्यावर लादतोय. क्रश असो, प्रेम असो वा ऑब्सेशन पण एका मुलीची अशा पद्धतीने नॅशनल टीव्हीवर प्रतीमा खराब करणं योग्य नाही. ती एखाद्याच्या प्रेमात वेडी आहे, हे सांगणारा तू कोण? असं मत अनेक लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

मनस्वी वशिष्ठचा सुम्बुलला पाठींबा सुंबुलचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता मनस्वी वशिष्ठ यानेही सुम्बुलला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्याने होस्ट सलमान खानवर टीका केली आहे. मनस्वी वशिष्ठने  इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहून सुंबुलला पाठिंबा दिला आहे. ‘नॅशनल टेलिव्हिजनवर एका साध्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाताना पाहून दु:ख होतंय. मी सुंबुलबरोबर काम केलं आहे. तू खूपच संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. मी बिग बॉसचा यंदाचा सीझन पाहतोय आणि सर्वजण सातत्याने ज्या प्रकारे तिच्या चारित्र्यावर बोलत आहेत ते पाहून मला खूप दु:ख होतंय. घरातील एकही सदस्य सुंबुलच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला नाही. हे खूपच वाईट आहे,’ असं त्याने म्हटलं आहे.

  

टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकलर्स