Join us  

Bigg Boss 16: हे प्रेम की मैत्री? ‘बिग बॉस 16’च्या घरात सुरू झाली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 11:04 AM

Bigg Boss 16 : गेल्या तीन दिवसांपासून टीना व शालीन दोघंही एकमेकांशी वाद घालताना दिसले. पण आता दोघांमधला वाद संपला आहे...

बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16 ) घरात एक लव्हस्टोरी फुलतांना दिसतेय. ही लव्हस्टोरी कुणाची तर टीना दत्ता (Tina Dutta) व शालीन भनोट (Shalin Bhanot ) यांची. गेल्या तीन दिवसांपासून टीना व शालीन भांडताना दिसले. दोघंही एकमेकांशी वाद घालताना दिसले. पण आता दोघांमधला वाद संपला आहे. रडून रडून टीनाची अवस्था वाईट झाली होती. अशात रडणाऱ्या टीनाला शालीनने सावरलं आणि सगळे मतभेद, सगळे रूसवे-फुगवे संपले. 

बिग बॉसने टीनाला कन्फेशन रूममध्ये बोलवत तिच्यासोबत एक खासगी माहिती शेअर केली. टीनाच्या पेट डॉगीची तब्येत खराब आहे, असं बिग बॉसने सांगितलं. हे ऐकून टीना रडायला लागली. यानंतर आपल्या रूममध्ये येऊन टीना आपल्या डॉगीच्या आठवणीत पुन्हा रडू लागते. शालीन तिच्या जवळ येऊन तिला प्रेमाने जवळ घेतो, तिला धीर देतो आणि यानिमित्ताने टीना व शालीन एकमेकांच्या जवळ येतात. यापुढे काहीही झालं तरी आपण एकमेकांची सोबत देऊ, असं वचन देत दोघंही एकमेकांना मिठी मारतात. याचदरम्यान, तुला मी आवडतो का? असा थेट प्रश्न शालीन करतो. टीना काहीही बोलत नाही, पण होकारार्थी मान हलवते आणि मग पुन्हा दोघं एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात.

शालीनने टीनाला घातली अंगठी...बिग बॉसच्या घरात क्षणात गेम बदलतो. याची झलक टीना व शालीनच्या निमित्ताने बघायला मिळाली. तीन दिवसांपूर्वी एकमेकांशी भांडत असलेले टीना व शालीन आता एकमेकांपासून क्षणभरही दूर राहायला तयार नाहीत. कन्फेशन रूममध्ये जात असताना टीना तिची रिंग फ्लॉन्ट करते.   एक गोष्ट दाखवू..., असं ती कॅमेऱ्यात बघून म्हणते आणि तिच्या बोटातील अंगठीची झलक पाहायला मिळते. ही अंगठी शालीनने टीनाला दिली आहे. एकंदर काय तर  बिग बॉसच्या घरात टीना व शालीनची लव्हस्टोरी सुरू झाली आहे. आता ही लव्हस्टोरी किती बहरते, ते बघूच.

टॅग्स :बिग बॉसटिना दत्ताटेलिव्हिजनकलर्स