Join us  

Bigg Boss 16 PROMO: तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...; श्रीजिताने टीना दत्तावर काढली भडास, पाहून भडकले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 1:24 PM

Bigg Boss 16 PROMO: टीना दत्ता ही घर फोडणारी आहे, ती अटेंशनची भुकेली आहे, असं काय काय श्रीजिता म्हणाली.

Bigg Boss 16 PROMO:  ‘बिग बॉस 16’ हा टीव्हीवरचा शो सध्या वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. सध्या चर्चा आहे ती टीना दत्ता (Tina Datta ) व श्रीजिता डे ( Sreejita De) या दोघींची. टीना व श्रीजिता या दोघींनी एकत्रच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. आम्ही दोघी मैत्रिणी आहोत, असा दावा दोघींनी केला होता. पण बिग बॉसच्या घरात काहीदिवस राहिल्यानंतर या दोघींमधली ‘सो कॉल्ड’ मैत्री कधी संपली कळलं देखील नाही. श्रीजिता व टीना दोघींच्या आई एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. पण टीना व श्रीजिता यांच्यात जराही पटत नाही. आता श्रीजिताने टीना दत्ताबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. टीना दत्ता ही घर फोडणारी आहे, ती अटेंशनची भुकेली आहे, असं काय काय श्रीजिता म्हणाली.

बिग बॉसने एक व्हिडीओ रिलीज केला आहे. या श्रीजिता व सौंदर्या टीनाबद्दल बोलत आहेत. ‘टीना मुलांच्या अटेंशनशिवाय राहूच श्कत नाही. तिने अनेकांचं घर संसार उद्धवस्त करण्याचे प्रयत्न केलेत. म्हणूनच अद्याप तिचा स्वत:चा संसार थाटल्या गेला नाही. तुम्ही आतून इतके दु:खी आहात की लोकांना खाली खेचून तुमच्या मनाला शोती मिळते,’असं काय काय श्रीजिता या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

श्रीजितावर भडकले लोक...

श्रीजिताने आपल्या मनातील भडास काढली, पण बिग बॉसच्या चाहत्यांना मात्र हे आवडलं नाही. टीनावर अशाप्रकारे चिखलफेक करणाऱ्या श्रीजितावर नेटकरी चांगलेच भडकले. मी टीना फॅन नाही. पण श्रीजिता तू एखाद्या मुलीच्या चारित्र्या वाईट बोलू शकत नाही. तू चुकते आहेस, असं एका युजरने लिहिलं. श्रीजिता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. एक सेलिब्रिटी असून दुसºया एका सेलिब्रिटीबद्दल इतके वाईट शब्द..., असं एका युजरने लिहिलं.श्रीजिताबिग बॉस 16 मधून एलिमिनेट झाली होती. काही दिवसांपूर्वीच तिची पुन्हा वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.  

टॅग्स :बिग बॉसटिना दत्ताटिव्ही कलाकारकलर्स