Bigg Boss 15 : ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरचा एक वादग्रस्त तेवढाच लोकप्रिय शो. या शोनं अनेकांना एका रात्रीत स्टार केलं. हा शो जिंकल्यानंतर काही जणांच्या करिअरची गाडी अशी काही सूसाट पळायला लागली की विचारू नका. शोमधून बाहेर पडताच स्पर्धक प्रोजेक्ट साईन करत सुटतात. अनेक जणांना तर शोमधून बाहेर येण्याआधीच प्रोजेक्ट मिळतात. बिग बॉस 15 चा फायनलिस्ट निशांत भट्ट (Nishant Bhatt) यापैकीच एक. बिग बॉस 15 च्या फिनालेआधीच निशांतच्या झोळीत एक मोठा प्रोजेक्ट पडला आहे.
टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस संपताच निशांत भट्ट एका शोमध्ये झळकणार आहे. होय, डान्स दिवाने ज्युनिअर हा शो तो जज करताना दिसेल. कलर्स वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे. अर्थात अद्याप मेकर्सनी या शोबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
निशांत भट्ट हा एक मोठा कोरिओग्राफर आहे. काही महिन्यांआधी निशांतने बिग बॉस ओटीटीमध्ये एन्ट्री घेतली होती. या शोमधून तो रनरअप बनून बाहेर पडला होता. यानंतर त्याने बिग बॉस 15मध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आणि बघता बघता फिनालेमध्येही आपली जागा पक्की केली. बिग बॉसच्या घरात निशांत अगदी वेगळ्या पद्धतीने गेम खेळताना दिसला. बिग बॉस 15 मध्ये सामील लाईव्ह ऑडियन्सच्या वोटिंगदरम्यान निशांतने एंटरटेनर नंबर 1 चा खिताब जिंकला होता.अर्थात ताज्या माहितीनुसार, निशांत भट्ट बिग बॉस 15 मधून बाद झाला आहे. पैशांची ब्रिफकेस घेऊन त्याने घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. अशात आता बिग बॉस फिनालेमध्ये तेजस्वी प्रकाश, प्रतिक सहजपाल, करण कुंद्रा व शमिता शेट्टी उरले आहेत. यांच्यापैकी एक जण बिग बॉस 15 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे.