Join us

'ती अटेंशन सिकर आहे'; रश्मी देसाईच्या एक्स बॉयफ्रेंडचं ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:00 IST

Rashami desai: रश्मीने बिग बॉसच्या घरात व्हीआयपी कंटेस्टंट म्हणून एन्ट्री केली आहे. यापूर्वी रश्मी 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. या पर्वात रश्मी आणि अरहान खान यांचं नातं चर्चेत आलं होतं.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई (rashmi desai) सध्या बिग बॉस १५ (bigg boss 15) मध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. रश्मीने बिग बॉसच्या घरात व्हीआयपी कंटेस्टंट म्हणून एन्ट्री केली आहे. यापूर्वी रश्मी 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. विशेष म्हणजे रश्मी यंदाच्या पर्वात सहभागी झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. कधी टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे तर कधी तिच्या भांडणांमुळे. या सगळ्या चर्चांमध्ये आता रश्मीच्या एक्स बॉयफ्रेंडचं ट्विट चर्चेत आलं आहे. 

'बिग बॉस १३'मध्ये रश्मी आणि अरहान खान  (arhaan khan) यांचं नातं चर्चेत आलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, अरहानविषयी एक सत्य समोर आल्यानंतर रश्मीने ब्रेकअप केला. मात्र, अजूनही सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगते. यात बिग बॉस १५ मध्ये रश्मीचा गेम पाहून अरहानने तिला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

"तुम्हाला काय वाटतंय ती बदलली आहे? नाही. ती अटेंशन सिकर आणि सिम्पथी गेनर आहे. Aisiladki तुम्हाला माहितीये जर तुम्ही #BiggBoss15 पाहात असाल", अशी पोस्ट अरहानने शेअर केली आहे. 

दरम्यान, बिग  बॉस १३ मध्ये रश्मी आणि अरहान यांचं नातं चांगलंच चर्चेत आसं होतं.यावेळी अरहानच्या लग्नाविषयी रश्मीला माहित होतं. परंतु, अरहानचं लग्न होण्यासोबतच त्याला एक मूल असल्याचं तिला माहित नव्हतं. सलमान खानच्या एका वाक्यामुळे अरहानचं बिंग रश्मीसमोर फुटलं आणि त्यानंतर रश्मीने अरहानपासून दुरावा निर्माण करत ब्रेकअप केला.

टॅग्स :रश्मी देसाईबिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकार