Bigg Boss 15 Finale : ‘बिग बॉस 15’चा फिनाले सुरू झालाये. काही तासांत बिग बॉसच्या या 15 व्या सीझनचा विजेता कोण? हे आपल्याला कळणार आहे आणि त्याआधी स्पर्धकांचे एकापेक्षा एक धम्माल परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहेत.
एंटरटेनमेंटचा हाय डोज देण्यासाठी राखी सावंत तिचा पती रितेशसोबत थिरकताना दिसणार आहे.राखी रितेशसोबत ‘बरेली की बर्फी’मधील सुपरहिट गाणं ‘बरेली वाले झुमके पे जिया ललचाए’वर थिरकताना दिसणार आहे.
करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश यांची बिग बॉस 15च्या घरातील रोमॅन्टिक केमिस्ट्री तुम्ही पाहिली असेलच. फिनालेमध्ये या दोघांचा रोमॅन्टिक डान्स पाहायला मिळणार आहे. शेरशाह या सिनेमातील ‘राता लम्बियां’ या रोमॅन्टिक गाण्यावर हे लव्हबर्ड्स थिरकणार आहेत.
शमिता शेट्टी व राकेश बापट हे लव्हबर्ड्सही या सीझनमध्ये दिसलेत. शमिता आधीच शोमध्ये होती. पण राकेश वाईल्ड कार्ड कंटेस्टंट बनून शोमध्ये आला होता. अर्थात तब्येतीच्या कारणास्तव त्याला शोमधून बाहेर पडावं लागलं होतं. फिनालेमध्ये शमिता व राकेश हे कपल ‘पुष्पा’ या ब्लॉकबस्टर सिनेमातील ‘सामी’ गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
रश्मी देसाई काल बिग बॉस 15मधून बाद झाली. आज रात्री फिनालेमध्ये रश्मी देसाई ‘टिप टिप बरसा पानी’वर आग लावताना दिसेल. काळ्या साडीत तिच्या धमाकेदार मुव्ह्स प्रेक्षकांना घायाळ करणार हे नक्की