Bigg Boss 15 Grand Finale: ‘बिग बॉस 15’चा विजेता कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना, निशांत भट्टचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. होय, निशांत पैशांची ब्रिफकेस घेऊन बिग बॉस फिनालेच्या रेसमधून बाहेर पडला आहे. रश्मी देसाई आधीच फिनालेमधून बाहेर पडली आहे. आज निशांतनेही फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ 10 लाखांची रक्कम घेऊन त्याने बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
बिग बॉसचे काही एक्स-कंटेस्टंट ऑफर घेऊन घरात गेलेत. बिग बॉसचं घर सोडण्यासाठी त्यांनी 10 लाखांची ऑफर दिली. पाच फायनलिस्टमधून निशांत भट्ट याने ही ऑफर स्वीकारली. टॉफीपेक्षा त्याने 10 लाख घेऊन घराबाहेर पडण्यास प्राधान्य दिलं.
सलमानने त्याचा निर्णय अगदी योग्य ठरवला. चाहत्यांच्या मतांच्या आधारावर निशांत हा शो जिंकू शकला नसता. त्यामुळे 10 लाख घेऊन घराबाहेर पडण्याचा त्याचा निर्णय अगदी योग्य आहे, असं सलमान म्हणाला.बिग बॉसच्या घराने मला ओळख दिली, असं म्हणत निशांत आनंदाने घराबाहेर पडला.निशांत बाहेर पडल्यानंतर आता केवळ चार फायनलिस्ट उरले आहे़ यात शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, प्रतिक सहजपाल व करण कुंद्रा यांचा समावेश आहे. यांच्यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
दरम्यान बिग बॉस 15 च्या फिनालेआधीच निशांतच्या झोळीत एक मोठा प्रोजेक्ट पडला आहे.टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस संपताच निशांत भट्ट एका शोमध्ये झळकणार आहे़ होय, डान्स दिवाने ज्युनिअर हा शो तो जज करताना दिसेल. कलर्स वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे. अर्थात अद्याप मेकर्सनी या शोबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
निशांत भट्ट हा एक मोठा कोरिओग्राफर आहे. काही महिन्यांआधी निशांतने बिग बॉस ओटीटीमध्ये एन्ट्री घेतली होती. या शोमधून तो रनरअप बनून बाहेर पडला होता. यानंतर त्याने बिग बॉस 15मध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आणि बघता बघता फिनालेमध्येही आपली जागा पक्की केली. बिग बॉसच्या घरात निशांत अगदी वेगळ्या पद्धतीने गेम खेळताना दिसला. बिग बॉस 15 मध्ये सामील लाईव्ह आॅडियन्सच्या वोटिंगदरम्यान निशांतने एंटरटेनर नंबर 1 चा खिताब जिंकला होता.