Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैकची लव्हस्टोरी आहे रंजक, गैरसमजांमुळे तुटता तुटता वाचले नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:18 IST

अभिनव आणि रुबीना यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती.

ठळक मुद्देअभिनवने सांगितले होते की, मी रुबीनाला पाहिले, त्यावेळी तिने खूपच सुंदर साडी घातली होती. ती त्यात खूपच सुंदर दिसत होती. या भेटीनंतर दीड वर्षं आम्ही मित्र-मैत्रीण म्हणून भेटत होतो.

गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या बिग बॉसच्या या सीझनला अखेर विजेता मिळाला. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर रुबीना दिलैकने बाजी मारत ती बिग बॉस 14व्या सीझनची विजेता ठरली तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला.

रुबीना ही अभिनेता अभिनव शुक्लाची पत्नी असून तो देखील तिच्यासोबत बिग बॉसच्या घरात होता. बिग बॉसच्या घरात असताना राखी सावंत अभिनवच्या प्रेमात पडल्याने अनेकवेळा राखी आणि रुबीना यांच्यात वाद झाला होता.

बिग बॉसच्या घरात रूबीनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेले, तेव्हा या कपलच्या वैवाहिक आयुष्यात फार काही ठीक नव्हते. अगदी दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यत पोहोचले होते. पण बिग बॉसच्या घरात एकत्र राहताना दोघांमधील मतभेद दूर झालेत.

अभिनव आणि रुबीना यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. याविषयी अभिनवने सांगितले होते की, मी रुबीनाला पाहिले, त्यावेळी तिने खूपच सुंदर साडी घातली होती. ती त्यात खूपच सुंदर दिसत होती. या भेटीनंतर दीड वर्षं आम्ही मित्र-मैत्रीण म्हणून भेटत होतो. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्या आहेत. आम्हाला दोघांना फिरण्याची आणि फिटनेसची आवड आहे. एका फोटोशूटसाठी आम्ही एकमकेांसोबत जास्त वेळ घालवला होता. त्यावेळी आम्हाला जाणवले की, आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत आणि काहीच महिन्यात आम्ही लग्न केले. 

अभिनव बिग बॉसच्या घरात असला तरी त्याला फिनाले पर्यंत पोहोचता आले नव्हते. पण पत्नीला मिळालेल्या यशामुळे तो प्रचंड खूश आहे.

टॅग्स :बिग बॉस १४बिग बॉस