Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14 : जास्मीन आऊट होताच अलीच्या प्रेमात पडली सोनाली फोगाट; म्हणाली, कुछ कुछ होता है...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 12:53 IST

‘बिग बॉस 14’ घरात बहरतेय नवी प्रेमकहाणी!

ठळक मुद्देसोनाली  सुमारे दशकभरापासून भाजपात सक्रिय आहे आणि सध्या पक्षाच्या महिला आघाडीची नॅशनल वर्किंग कमेटीची व्हाईट प्रेसिडेंट आहे.

‘बिग बॉस 14’चा स्पर्धक अली गोनी आणि घरातून बाहेर पडलेली जॅस्मिन भसीन यांच्या नात्याबद्दल आता सगळ्यांनाच माहित आहे. दोघेही एकमेकांच्या किती प्रेमात आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याच आठवड्यात जास्मीन ‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडली आणि ती बाहेर पडून आठवडा होत नाही तोच, सोनाली फोगाटने अलीवरच्या प्रेमाची कबुली दिली. होय, ‘बिग बॉस 14’च्या घरात सध्या नवे प्रेम फुलताना दिसतेय. 

आता या प्रेमाची सुरुवात कशी झाली तर गमतीगमतीत. होय, अर्शी, सोनाली, एजाज व अली असे चौघे एकमेकांसोबत बसले असताना अचानक अर्शीला सोनालीची टिंगल करण्याची हुक्की आली. मग काय, तू फक्त 5 मिनिटे अली व एजाजच्या डोळ्यात बघ, असा टास्क तिने सोनालीला दिला. सोनालीने एजाजच्या डोळ्यात पाहिले. पण अलीच्या डोळ्यात बघण्याची तिची हिंमत झाली नाही. लाजून लाजून ती चूर झाली.

मग काय, अर्शीने सोनालीची मजा घेणे सुरु केले. थोड्याच वेळात,सोनालीने अलीला पाहिल्यावर मला ‘कुछ कुछ होता है’ असे सांगून आपल्या प्रेमाची कबुली दिली. मला याआधी असे काहीच फिल झाले नव्हते. पण आता अलीला पाहिल्यावर मला खूप वेगळी फिलिंग येतेय. माझ्या भावना मी रोखू शकत नाहीये, असे सोनाली म्हणाली. तिच्या या कबुलीनंतर बिग बॉसच्या घरातील सर्वांनाच हसू आवरले नाही.तू खूप विचार करू नकोस, ही फिलिंग एन्जॉय कर, असा सल्ला एजाजने सोनालीला दिला.

पतीच्या मृत्यूनंतर एका मुलाच्या प्रेमात पडली पण...

अलीसमोर आपल्या भावना व्यक्त करताना सोनाली काहीशी इमोशनल होतानाही दिसली. पतीच्या निधनानंतर मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते. पण काही कारणास्तव ते नाते फार काळ टिकले नाही, असे सोनाली म्हणाली. सोनाली भावूक झालेली पाहून अलीने तिला त्याच्या डोळ्यात पाहण्यास सांगितले. पण सोनाली यावेळी अलीच्या डोळ्यांत बघू शकली नाही. मेरी दुनिया ही बदल गई... केवळ इतकेच ती म्हणाली. तिच्या या वाक्याने अलीही लाजला.

सोनाली  सुमारे दशकभरापासून भाजपात सक्रिय आहे आणि सध्या पक्षाच्या महिला आघाडीची नॅशनल वर्किंग कमेटीची व्हाईट प्रेसिडेंट आहे.  यापूर्वी दूरदर्शनवर अँकर म्हणून तिने काम केले होते. ‘अम्मा’ या मालिकेत तिने अभिनेता नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती.   हरियाणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सोनालीने आदमपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भजनलालचे सुपुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती.   सोनाली टीकटॉक स्टार असून टीकटॉकवर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.   सोनालीने हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना चारचौघात चप्पलेनेमारहाण केली होती. सोशल मीडियावर  हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. 

IN PICS: जाणून घ्या कोण आहेत 'बिग बॉस 14'मध्ये एंट्री घेणाऱ्या सोनाली  

टॅग्स :बिग बॉस १४