Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14 : पवित्राच्या नादाला लागलास तर बर्बाद होशील...! एक्स-बॉयफ्रेन्डने एजाजला दिला सल्ला

By रूपाली मुधोळकर | Updated: October 16, 2020 18:26 IST

तिचे नाव पवित्रा नाही अपवित्रा असायला हवे...

ठळक मुद्देपारसला डेट करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे पवित्राने म्हटले होते. यावर पारसने उत्तर दिले होते.

‘बिग बॉस 14’च्या घरात सध्या एक स्पर्धक सगळ्यांवर भारी पडतेय. ती कोण तर पवित्रा पुनिया. आक्रमक स्वभावाची पवित्र यंदाच्या सीझनची दमदार कन्टेस्टंट म्हणून चाहत्यांच्या नजरेत भरली आहे. तिची व एजाज खानची गेल्या काही दिवसांपासून रंगत असलेली केमिस्ट्रीही चर्चेचा विषय बनली आहे. आता ही केमिस्ट्री किती खरी किती खोटी ते आम्हाला ठाऊक नाही. पण हो, पवित्राचा एक्स-बॉयफ्रेन्ड पारस छाब्रा याने मात्र ही केमिस्ट्री बहरण्याआधीच एजाजला सावध केले आहे. भावा, या बाईच्या नादाला लागू नकोस, नाहीतर करिअर संपेल, अशा शब्दांत पारसने एजाजला सावध केले आहे. 

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत पारस पवित्राबद्दल बोलला. याच मुलाखतीत त्याने एजाजला पवित्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.एजाज एक चांगला माणूस आहे. त्याने अनेक मोठ्या शोमध्ये काम केले आहे. त्याचे करिअर बर्बाद होऊ नये असे मला वाटते. करिअर संपवायचे नसेल तर त्याने पवित्रापासून दूर राहण्यातच भलाई आहे. पवित्रा अजिबात विश्वासू नाही. खोट बोलण्यात आणि आपले काम काढून घेण्यात तर ती पटाईत आहे, असे पारस म्हणाला.

तिचे नाव पवित्रा नाही अपवित्रा असायला हवे...पवित्रा हे नाव तिला अजिबात शोभत नाही. नाव पवित्रा आणि स्वभाव याच्या अगदी उलट. माझ्यामते, तिचे नाव पवित्रा नाही तर अपवित्रा असायला हवे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिने माझ्यावर बरेच आरोप केले होते. पण बिग बॉसमध्ये तिने स्वत:च ती डबल डेट करत होती, अशी कबुली दिली आहे. माझ्यासोबत   रिलेशनशिपमध्ये असताना दुस-या एका तरुणाला डेट करत होती. माझ्याशी डेट करत असताना तिने तिचे लग्नही माझ्यापासून लपवून ठेवले. म्हणून एजाजने अशा  बाईच्या नादाला लागू नये, असे मला वाटते, असे पारस म्हणाला.

पवित्रा पुनियाने बिग बॉसच्या घरात धडाकेबाज एन्ट्री घेतली. हीच पवित्रा आधी बिग बॉस 13 चा स्पर्धक राहिलेला पारस छाब्राला डेट करत होती. कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले होते. पण आता बिग बॉस 14 च्या निमित्ताने या दोघांच्या रिलेशनशिपबद्दलच्या अनेक गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत.

पारसला डेट करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे पवित्राने म्हटले होते. यावर पारसने उत्तर दिले होते. मला डेट करत असताना पवित्रा विवाहित होती. पवित्राच्या पतीने मला मॅसेज केला, त्यानंतर कुठे ती विवाहित असल्याचे मला कळले होते, असे पारसने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. पवित्रा 2009 मध्ये सर्वप्रथम एमटीव्ही स्प्लिटविलामध्ये दिसली होती. यानंतर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत तिने निधीची भूमिका साकारली होती. प्रीतो, नागिन 3, कवच, डायन या मालिकेतही ती झळकली. विशेषत: तिने साकारलेल्या निगेटीव्ह भूमिका खूप लोकप्रिय झाल्या. बालवीर रिटर्न्स या मालिकेत तिने साकारलेली तिमनासाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

टॅग्स :बिग बॉस १४