Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14 : बिग बॉसमधील वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली पोस्टपोन, यासाठी सिद्धार्थ शुक्ला आहे कारणीभूत

By तेजल गावडे | Updated: October 14, 2020 19:48 IST

बिग बॉसच्या घरात तीन स्पर्धक वाइल्ड कार्डने १८ ऑक्टोबरला एन्ट्री करणार होते. पण आता स्पर्धकांना आणखीन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बिग बॉसच्या चौदाव्या सीझनला गेल्या आठवड्यात सुरूवात झाली. या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बिग बॉसच्या घरात तीन स्पर्धक वाइल्ड कार्डने १८ ऑक्टोबरला एन्ट्री करणार होते. यात शार्दुल पंडित, सपना यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. पण आता स्पर्धकांना आणखीन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीशी संबंधीत मिळालेल्या माहितीनुसार आता वाइल्ड कार्ड एन्ट्री २३ ऑक्टोबरला होणार आहे.

प्रभात खबरच्या रिपोर्टनुसार, वाइल्ड कार्ड एन्ट्री पोस्टपोन करण्यामागे सिद्धार्थ शुक्ला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान यांना बिग बॉसचे घर सोडावे लागणार आहे. यंदाचा सीझनही सिद्धार्थचा शो वाटत असल्याचे बोलले जात आहे. त्यात सिद्धार्थ शुक्लामुळे बिग बॉसच्या १४व्या सीझनची चर्चा होत असल्यामुळे निर्मात्यांना सिद्धार्थला शोमधून बाहेर काढायचे नाही आहे. सिद्धार्थला आणखीन काही दिवस घरात ठेवण्याचा निर्मात्याचा प्लान आहे. 

बिग बॉस १४शी संबंधीत अशीही चर्चा ऐकायला मिळते आहे की बिग बॉसचे जुने स्पर्धक असीम रियाज, गौतम गुलाटी आणि रश्मी देसाईदेखील बिग बॉस १४मध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

तर बिग बॉसची एक्स कंटेस्टंट शेफाली जरीवाला नुसार, बिग बॉसचा चौदावा सीझन फक्त सिद्धार्थ आणि निक्की तांबोळीमुळे चालतो आहे. शेफाली जरीवालालाने बिग बॉस १३व्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मारली होती. शेफाली जरीवालाने ट्विट केले की, असे वाटतंय की सिद्धार्थ शुक्ला आणि निक्की तांबोळी हा शो चालवत आहेत. तुम्हाला काय वाटतंय?.

शेफाली जरीवाला सारा गुरपालच्या इविक्शनमुळेही खूप निराश झाली आहे. 

टॅग्स :बिग बॉस १४सिद्धार्थ शुक्लाशेफाली जरीवाला