Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी 2: साप्ताहिक कार्यात कोणती टीम मारणार बाजी, घरामध्ये रंगणार एक खास टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:55 IST

काल या टास्क मध्ये विणाची टीम विजेती ठरली. विणाच्या टीमने चातुर्याने काल या टास्कमध्ये विजय मिळवला.

बिग बॉस १२ मधील प्रत्येक दिवस स्पर्धकांसाठी कठीण होत चालला आहे. त्यात बिग बॉसच्या घरात काही मिळवायचं असेल तर स्पर्धकांना बराच घाम गाळावा लागतो. त्यातच आता स्पर्धकांना एक खास टास्क देण्यात येणार आहे.त्यातच  स्पर्धकांना मिळालेला टास्क पूर्ण करुन लक्झरी बजेट मिळवावं लागणार आहे.

घरामध्ये सध्या '' एक डाव धोबीपछाड'' हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. ज्यामध्ये सदस्य पुर्णपणे साम दाम दंड भेद यांचा चातुर्याने उपयोग करून टास्क जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. काल या टास्क मध्ये विणाची टीम विजेती ठरली. विणाच्या टीमने चातुर्याने काल या टास्कमध्ये विजय मिळवला. आज देखील विणा आणि पराग मॅनेजर असून आज हे दोघे कुठल्या योजना आखून टास्क जिंकतील हे बघणे रंजक असणार आहे.

काल नेहा, पराग V/S शिव अशी खडाजंगी बघयला मिळाली, ज्यामध्ये नंतर परागची तब्येत देखील थोडी बिघडली. यामध्येच शिवने विरोधी टीमची ईस्त्री चोरली होती. आज देखील टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरस बघायला मिळणार आहे. आज दोन्ही टीम बळाचा वापर करताना दिसणार आहेत आणि ज्यामुळेच कॅप्टनने म्हणजेच वैशालीने “मी दोन्ही टीमला डिस्कॉलिफाय करत आहे असे जाहीर केले.

 

घरामध्ये टास्क बरोबरच सदस्यांमध्ये बरीच मस्ती देखील होत असते. आज सगळे सदस्य मिळून अभिजीत बिचुकले यांना पाण्यामध्ये टाकणार आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत बिचुकले