‘स्टार प्लस’वर लवकरच ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. यातील आठ वर्षांच्या मरियम खानची भूमिका देश्ना दुगड ही बालकलाकार साकारणार असून जगाकडे पाहण्याचा तिचा निरागस दृष्टिकोन हा आपल्याला ताज्या हवेच्या झुळुकीसारखा ताजेतवाने करणारा ठरेल.या मालिकेमुळे देशना दुगड ही छोट्या पडद्यावरील बहुचर्चित बालकलाकार बनणार असली, तरी ती ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातही भूमिका रंगवीत आहे. या महान अभिनेत्याबरोबर देश्ना एकत्रित भूमिका तर साकारणार आहेच, पण आपल्या कामगिरीने तिने अमिताभ बच्चन यांना आपले चाहता बनविले आहे, असेही सांगितले जाते. देश्ना म्हणाली, ठया चित्रपटात त्या दिवशी मला काही अॅक्शन प्रसंग उभे करायचे होते. ते केल्यानंतर स्वत: बच्चनसाहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की माझी कामगिरी पाहून ते खूपच भारावून गेले आहेत. ते ऐकून मला फार आनंद झाला आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यानंतर चित्रीकरणापूर्वी मी आता त्यांना वाकून नमस्कार करते.बच्चनसरांकडून माझी प्रशंसा होणं ही माझ्यादृष्टीने फार मोठी बाब आहे.”
एकीकडे नवीन मालिका छोट्या पडद्यावर दाखल होणार म्हटल्यावर रसिकांना नवीन काही तरी पाहायला मिळणार असलं तरी ये है मोहब्बते मालिकेच्या चाहत्यांसाठी एक थोडी नाराज करणारी बातमी आहे. कारण मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह ही नवीन मालिका ये है मोहब्बते मालिकेच्या वेळेत प्रसारित होणार आहे. मालिकांच्या वेळेत बदल झाल्यामुळे एकीकडे नाराजीचा सुरही चाहत्यांमध्ये पाहायला मिळणार हे मात्र नक्की. 21 मे पासून ये है मोहब्बते मालिका रात्री 10:30 प्रसारित केली जाणार आहे.'मरियम खान रिपोर्टिंग लाइव' मालिकेत 9 वर्षाची चिमुरडी देशना दुगड मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.भोपालच्या पार्श्वभूमीवर मालिकेची कथा असणार आहे.या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'बाल कृष्ण'मालिकेत झळकली होती.सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे.मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेतही आकृती शर्मा ही सात वर्षाची चिमुरडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.अल्पावधीतच या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे 'कुल्फी कुमार बाजेवाला'प्रमाणेच 'मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.
बिग बी अमिताभ बच्चनहे आहेत ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेतीला या बालकलाकाराचे फॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:55 IST