Actress Monalisa: भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे मोनालिसा. आजवर तिने अनेक बॉलिवूड, टीव्ही आणि भोजपुरी इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमवला आहे. मोनालिसा तिच्या दमदार अभिनयासह सौंदर्यामुळे देखील तितकीच चर्चेत असते. सध्याच्या घडीला तिची गणना भोजपुरी इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांमध्ये केली आहे. तिचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. अलिकडेच मोनालिसाने एका मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील तिचा संघर्ष आणि पडद्यामागच्या वास्तवावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिला आलेल्या धक्कादायक अनुभवांविषयी सांगितलं. दरम्या इंटीमेट सीन करताना कधी कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला? यावर उत्तर देताना एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला प्रसंग शेअर केला.सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने म्हटलं,"एका चित्रपटाचं शूटिंग करताना अभिनेत्याने इंटीमेट सीनच्या वेळी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता.त्या सीननंतर दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर अभिनेता संतापला आणि त्याने दिग्दर्शकालाच शिवीगाळ केली." हा अनुभव तिच्यासाठी धक्कादायक होता,असंही अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं.
त्याचबरोबर ती असंही म्हणाली की, इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला सारख्या बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स आल्या.त्यापैकी अर्ध्याहून अधिक चित्रपट तर प्रदर्शित झालेच नाहीत. खरंतर, यासाठी मी कृतज्ञ आहे की ते रिलीज झाले नाहीत. पण मला पडद्यावर इंटिमेट सीन करताना कधीच कोणती समस्या आली नाही." असा खुलासा तिने केला. परंतु, उदरनिर्वाहासाठी तिने अशा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मोनालिसाने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहां जायबा राजा नजरिया लडाईके' या पहिल्या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसा स्टार बनली. निरहुआसोबतचा तिचा पहिला भोजपुरी चित्रपट हिट ठरला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. भोजपुरी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी, उडिया आणि बंगाली भाषांमधील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मोनालिसाने सांगितले की, त्या सीननंतर दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर अभिनेता संतापला आणि त्याने दिग्दर्शकालाच शिवीगाळ केली. हा अनुभव तिच्यासाठी धक्कादायक होता पण अशा परिस्थितीत स्वतःला सावरत तिने काम सुरू ठेवले.
Web Summary : Actress Monalisa shared a disturbing incident where an actor crossed boundaries during an intimate scene. After the director called 'cut,' the actor became enraged and verbally abused him. Monalisa also discussed facing offers for B-grade films and her journey in the industry.
Web Summary : मोनालिसा ने एक चौंकाने वाली घटना साझा की, जिसमें एक अभिनेता ने इंटीमेट सीन के दौरान सीमाएं पार कीं। निर्देशक के 'कट' कहने के बाद, अभिनेता क्रोधित हो गया और उसे गाली दी। मोनालिसा ने बी-ग्रेड फिल्मों के प्रस्तावों और उद्योग में अपनी यात्रा पर भी चर्चा की।