Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - घरात काम करताना अभिनेत्रीची वाईट अवस्था; कॅमेरा पाहताच बदलला एटीट्यूड, झाली हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 17:31 IST

अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती घरातील कामे करताना दिसत आहे.

भोजपुरी सिनेमापासून ते टेलिव्हिजनपर्यंत मोनालिसाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोनालिसाने सोशल मीडियावरही तिची खास फॅन फॉलोइंग तयार केलं आहे, ज्यांच्यासाठी ती अनेकदा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती घरातील कामे करताना दिसत आहे.

मोनालिसा साडीचा पदर कमरेला खोचून घरामध्ये काम करत आहे. तिचे केस थोडे विस्कटलेले आहेत. प्रत्येक सामान्य स्त्री ज्या पद्धतीने आपल्या घराची काळजी घेते, त्याच पद्धतीने ती विखुरलेल्या वस्तू गोळा करत आहे. मोनालिसा तिच्या कामात खूप व्यस्त होती, पण कॅमेरा पाहताच तिचा एटीट्यूड पटकन बदलला.

अभिनेत्रीने कमरेला खोचलेला पदर नीट केला, केस नेट केले आणि कॅमेऱ्यासमोर हिरोईन सारख्या पोझ देऊ लागली. मोनालिसाचा हा फनी व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. कमेंटमध्ये हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.