Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आपका रेट क्या है?" भर कार्यक्रमात अँकरचा अश्लील सवाल, सिंगरने चप्पल काढून मारलं; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 08:45 IST

भर कार्यक्रमात गायिकेला अँकरने मंचावरच अश्लील प्रश्न विचारला. ज्यामुळे गायिकेचा पारा चढला. अँकरच्या प्रश्नाने संतप्त झालेली गायिका चप्पल काढून त्याला मारायला धावली.

प्रसिद्ध गायिकेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. भर कार्यक्रमात गायिकेला अँकरने मंचावरच अश्लील प्रश्न विचारला. ज्यामुळे गायिकेचा पारा चढला. अँकरच्या प्रश्नाने संतप्त झालेली गायिका चप्पल काढून त्याला मारायला धावली. कार्यक्रमातील या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बिहारमधील सारण जिल्ह्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भोजपरी सिंगर निशा उपाध्याय एका लाइव्ह शोमध्ये स्टेजवर परफॉर्म करत होती. त्याचवेळी अँकरने गायिकेला तिच्या मानधनावरुन "आपका रेट क्या है?" (तुझा रेट काय आहे?) असा अश्लील प्रश्न विचारला. ज्यामुळे निशा भडकली. आणि ती थेट अँकरच्या अंगावर धावून गेली.  पायातील चप्पल काढून तिने अँकरला मारल्याचंही या व्हायरल झालेल्या व्हिडीओत म्हटलं गेलं आहे. या व्हिडीओमध्ये अनेक लोक स्टेजवर आल्याचं दिसत आहे. सिंगर निशाच्या हातात चप्पल आहे आणि ती अँकरला मारण्यासाठी जात असताना तिला काही जण अडवताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. निशाने घेतलेल्या अॅक्शनेमुळे लोक तिचं कौतुक करत आहेत. निशा ही भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका गावातील ती असून सध्या पटना येथे वास्तव्यास आहे. निशाने गायलेली लोकगीते लोकप्रिय ठरली आहेत. तिच्या शोजलाही चाहते गर्दी करताना दिसतात. 

टॅग्स :सेलिब्रिटी