कॉमेडी क्वीन म्हणून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली सेलिब्रिटी म्हणजे भारती सिंह. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर भारतीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. भारती तिच्या विनोदांसोबतच तिच्या फ्रेंडली स्वभावामुळेही कायम चर्चेत असते. आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या भारतीने सुरुवातीच्या काळात बऱ्याच हालअपेष्टा सहन केल्या. परंतु, आज इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान तिने निर्माण केलं आहे.
संघर्षापासून सुरु झालेलं भारतीचं आयुष्य आता कुठे थोडं स्थिरस्थावर झालं आहे. इतकंच नाही तर मेहनतीच्या जोरावर तिने कोटयवधींची संपत्तीदेखील जमवली आहे. त्यामुळेच तिचं नेटवर्थ किती असेल असा प्रश्न तिच्या चाहत्यांना बऱ्याचदा पडतो. भारतीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला द कपिल शर्मा शो, इंडियाज गॉट टॅलेंट, खतरों कें खिलाडी यांसारखे गाजलेले शो केले. या टीव्ही शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे तिच्या कमाईचा ६० टक्के भाग हा टिव्ही शोच्या माध्यमातून ती कमावते.
सूत्रसंचालनातूनही कमावते पैसे
भारती फक्त विनोदवीरचं नाही तर ती उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहे. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तिने केलं आहे. त्यामुळे कमाईमधील २० टक्के भाग हा ती सूत्रसंचालन, लाइव्ह शो यांच्या माध्यमातून कमावते.
ब्रँड प्रमोशनदेखील कमाईचा मार्ग
भारती अनेक मोठ मोठ्या ब्रँडचं प्रमोशनदेखील करते. त्यामुळे ती यातून १५ टक्क्यांपर्यंत कमाई करते. तसंच सोशल मीडिया आणि व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही तिची ५ ते ६ टक्क्यांची कमाई होते.
दरम्यान, अमृतसरमधील मध्यमवर्गीय कुटुंबात भारतीचा जन्म झाला होता. लहानपणी भारती आणि तिच्या कुटुंबाने अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज तिने इंडस्ट्रीत तिचं नाव कमावलं आहे. २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधलेल्या भारतीचं नेटवर्थ जवळपास ८० कोटी रुपये इतकं आहे.
Web Summary : Bharti Singh, known as the 'Comedy Queen,' earns crores through TV shows, hosting, brand promotions, and social media. From humble beginnings, she now boasts a net worth of approximately 80 crore rupees, achieved through hard work and dedication.
Web Summary : कॉमेडी क्वीन के रूप में मशहूर भारती सिंह टीवी शो, होस्टिंग, ब्रांड प्रमोशन और सोशल मीडिया से करोड़ों कमाती हैं। साधारण शुरुआत से, अब उनकी कुल संपत्ति लगभग 80 करोड़ रुपये है, जो कड़ी मेहनत और समर्पण से हासिल की गई है।