Join us
Daily Top 2Weekly Top 5

भजी म्हणतोय पाकिस्तानी कॉमेडियन हे कॉमेडीतले सचिन तेंडुलकर

By admin | Updated: July 13, 2016 17:02 IST

मझाक मझाक में या कार्यक्रमात क्रिकेटर हरभजन सिंग परीक्षकाची भूमिका साकारणार आहे.

मझाक मझाक में या कार्यक्रमात क्रिकेटर हरभजन सिंग परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमात पाच वेगवेगळ्या राज्यातील कलाकार असून ते आपापल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या पाच राज्यातून एक राज्य विजेता राज्य म्हणून निवडले जाणार आहे. हरभजन या कार्यक्रमाद्वारे त्याच्या छोट्या पडद्यावरील इनिंगला सुरुवात करत आहे. कपिल शर्मा, सुनिल ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी यांसारख्या कॉमेडीयनचा कपिल फॅन आहे. पण त्यांच्यापेक्षाही पाकिस्तानच्या कॉमेडीयनच्या तो जास्त प्रेमात आहे. पाकिस्तानमधील कॉमेडीयन्स हे कॉमेडीमधील सचिन तेंडुलकर आहे असे तो सांगतो.