Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत सोडून परदेशात स्थायिक झाली लोकप्रिय अभिनेत्री; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अभिनयातूनही घेणार ब्रेक? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:30 IST

'बालिका वधू' फेम अभिनेत्रीने कायमचा सोडला देश? पतीसह 'या' ठिकाणी झाली स्थायिक, काय आहे कारण? म्हणाली...

Avika Gor: लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री अविका गौर कायम तिच्या कामामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे.मात्र, 'बालिका वधू'या मालिकेमुळे आजही ती चाहत्यांमध्ये ओळखली जाते. अविकाने ऑक्टोबर २०२५ मध्ये उद्योगपती मिलिंद चंदवाणी यांच्याशी विवाह केला. सध्या ती आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे. आपला अभिनय आणि सौंदर्याने लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या नायिकेने देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने भारत सोडून पतीसह परदेशामध्ये राहण्यास सुरुवात केली आहे.  तिच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला. त्यात आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने या निर्णयाबाबत खुलासा केला आहे. 

सध्या अविका गौर ही पती मिलिंद चांदवानीसह बँकॉकमध्ये शिफ्ट झाली आहे.
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने हा निर्णय घेतल्यांने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हिंदुस्तान टाइम्स सोबत संवाद साधताना अविका म्हणाली, "हो, मी आणि मिलिंद बँकॉकमध्ये स्थायिक झालो आहोत. आम्ही तिथे एक घरही विकत घेतले आहे, जे मी माझ्या आवडीनुसार सजवत आहे.मिलिंद आणि मला वाटले की तिथे त्यांच्या कामासाठी चांगल्या संधी आहेत. आणि मलाही ते ऐकून छान वाटलं." त्यानंतर पुढे अविका म्हणाली," आम्ही सात वर्षे एकमेकांना डेट केलं आहे. जर मला असा एखादा प्रोजेक्ट मिळाला, ज्यासाठी मला महिनोन् महिने दूर राहावे लागत असे, तर मला त्याचा कायम पाठिंबा असायचा. त्यामुळे केवळ माझ्यामुळेत्याच्या प्रगतीत अडथळा येऊ नये, असं मला वाटतं."

यापुढे अभिनेत्री अभिनयातून ब्रेक घेण्याच्या चर्चांवर उत्तर देत म्हटलं, "मी मुंबईत असतानाही हैदराबाद, राजमुंद्री किंवा विशाखापट्टणम येथे शूटिंग करत होते. माझ्या लक्षात आले की मुंबईच माझ्या कामाचं मुख्य ठिकाण असू शकत नाही. मी मुंबईत येऊन फक्त एक महिना झाले आहे आणि कामामुळे बहुतेक वेळा हैदराबादला राहते. माझं प्राधान्य हे कामालाच असेल, कारण त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे." 

प्रोजेक्ट्स गमावण्याची चिंता वाटते का? असं विचारल्यावर अविका म्हणाली, "माझ्याकडे जे काही काम येते ते माझ्या वेळापत्रकानुसारच असतं, त्यामुळे मला नाही वाटत की कधी काही अडचण येईल." असं अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Avika Gor relocates abroad, addresses career break speculation.

Web Summary : Avika Gor moved to Bangkok with her husband, focusing on his career opportunities. She clarified that this relocation won't hinder her acting career, emphasizing her continued commitment to work and dismissing rumors of a break from acting.
टॅग्स :अविका गौरटेलिव्हिजनसेलिब्रिटी