बॉलिवूडमध्ये एकेकाळी लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यांना कालांतराने कुठेच काम मिळत नाही. मग हे अभिनेते अभिनय क्षेत्र सोडून वेगळी वाट निवडतात. कोणी बिझनेसमन होतो तर कोणी रेस्टॉरंट उघडतो. पण बॉलिवूडमध्ये कोणे एके काळी चर्चेत असलेला आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने अभिनय क्षेत्र सोडून जादूगार होण्याची वाट निवडली आहे. हा अभिनेता म्हणजे 'बागबान' फेम अमन वर्मा. सोशल मीडियावर अमनचा (aman varma) व्हिडीओ पाहून लोकांनी ही चर्चा करायला सुरुवात केली आहे.
अमन वर्मा झाला जादूगार
अमन वर्माने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो हातचलाखी करुन सर्वांना जादूने आकर्षित करत आहेत. या व्हिडीओखाली अमनने कॅप्शन लिहिलंय की, "अशी जादू शिकणे थोडे अवघड होते, पण मी जमवले. हे सर्व हातचलाखीवर अवलंबून आहे." याशिवाय मला अमन वर्मा नाही तर 'अमन यतन वर्मा' म्हणा, अशा शब्दात अमनने स्वतःचं नवीन नाव सर्वांना सांगितलंय. अमनचा हा व्हिडीओ पाहून आर्थिक अडचणींमुळे अमन जादूगार झाला, अशी सर्वांनी अटकळ बांधली. इतकंच नव्हे "पापी पेट का सवाल!" अशी अमनने या व्हिडीओखाली प्रतिक्रिया दिली. काय आहे सत्य?
अनेकांना वाटलं की अमन खरंच पैसे कमावण्यासाठी जादूगार झाला. तर असं नाही, अमनने केलेले जादूचे परफॉर्मन्स त्याच्या आगामी चित्रपटाच्या भूमिकेसाठी होते. आर्थिक अडचणींमुळे मी जादूचे प्रयोग केले नाहीत, हे अमनने स्पष्ट केलं. अमन वर्मा हा २००० च्या दशकात भारतीय टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा होते. त्याने 'खुल जा सिम सिम' सारख्या गेम शोचे सूत्रसंचालन केले. याशिवाय 'बिग बॉस ९' मध्येही भाग घेतला होता. अमन लवकरच श्राप या सिनेमातून भेटीला येणार आहे. याच सिनेमाच्या सेटवर अमनने हे जादूचे प्रयोग केले, असं समजतंय.