Join us

ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 14:30 IST

मराठी कलाकारांनीही दिवाळी पाडवा साजरा केला. दिवाळी पाडव्याला ऐश्वर्या नारकर यांना अविनाश यांच्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे. 

सध्या दिवाळीचा सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करतात. नुकतंच दिवाळीतील दिवाळी पाडवा पार पडला. यादिवशी पत्नी पतीचं औक्षण करते. ओवाळणी म्हणून नवरा बायकोला दिवाळी पाडव्याच्या दिवशी खास भेटवस्तू देतो. मराठी कलाकारांनीही दिवाळी पाडवा साजरा केला. दिवाळी पाडव्याला ऐश्वर्या नारकर यांना अविनाश यांच्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. याचा व्हिडिओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या अविनाश नारकर यांचं औक्षण करताना दिसत आहे. त्यानंतर अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांना पाडव्याचं गिफ्ट म्हणून सोन्याची भेटवस्तू दिली आहे. सोन्याची ठुशी आणि कानातले असं गिफ्ट ऐश्वर्या यांना मिळालं आहे. पाडव्याचं मिळालेलं गिफ्ट पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक सिनेमांमध्ये काम केलेली ही लाडकी जोडी आजही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसते. सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असतात. अनेक ट्रेंडिंग गाण्यावरही ते रील व्हिडिओ बनवताना दिसतात.

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकारदिवाळी 2024