Join us

'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:01 IST

नारकर कपलचा व्हिडिओ पाहिलात का?

गायक संजू राठोड 'गुलाबी साडी' गाण्यामुळे जगभरात प्रसिद्ध झाला. जगाच्या कानाकोपऱ्यात हे गाणं वाचजलं. प्रत्येक गल्लीबोळापासून ते अंबानींच्या मुलाच्या लग्नातही संजूला खास हे गाणं गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. नंतर त्याचं 'नऊवारी' हे गाणंही हिट झालं. आता तो 'एक नंबर तुझी कबर' गाणं घेऊन आला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनाही या या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरलेला नाही.

आजकाल सोशल मीडियावर रील्स व्हायरल झाले की आपोआप ती गाणीही हिट होतात. संजूचं 'एक नंबर तुझी कंबर'हे गाणं सध्या जागोजागी वाजतंय. रील्स बाबतीत कायम पुढे असणारे नारकर कपल यांनीही या व्हायरल गाण्यावर ठुमके लावले आहेत. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर सध्या व्हिएतनाममध्ये फिरण्याचा आनंद घेत आहेत. परदेशातही रील बनवण्याचा मोह त्यांना आवरता आलेला नाही. रील्समधून आणि फोटोमधून व्हिएतनामच्या सौंदर्याची झलक त्यांनी चाहत्यांना दाखवली आहे.  तेथील हॅलोंगबे या सुंदर जागी संध्याकाळच्या वेळी त्यांनी या गाण्यावर रील शूट केलं. अविनाश नारकर पांढरा टीशर्ट, जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. तर ऐश्वर्या काळ्या वनपीसमध्ये सुंदर दिसत आहेत. बघता बघता त्यांचं रील आता व्हायरल होतंय.

नारकर कपलला अनेकदा रील्सवरुन ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र ते ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करुन आपापला आनंद साजरा करतात. अनेक ऐश्वर्या नारकर ट्रोलर्सला सडेतोड उत्तरंही देताना दिसतात. 

संजू राठोडच्या या गाण्याला युट्यूबवर २० मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बिग बॉस हिंदीत झळकलेली ईशा मालवीयने या गाण्यात डान्स केला आहे. मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीही या गाण्याची फॅन झाली आहे.

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरसोशल मीडियासंगीत