Join us

प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते होता सारेगमप हिंदीमध्ये स्पर्धक, ऐका त्याने गायलेले हे गाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:19 IST

अवधूतचा सारेगमप हिंदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत बालिकावधू या चित्रपटातील बडे अच्छे लगते है गाणे तो गाताना दिसत आहे.

ठळक मुद्देहे गाणे तो अतिशय सुंदररित्या गात असून त्याचा आवाज ऐकून उपस्थित सगळेच मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत.

अवधूत गुप्तेने आज एक गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाद्वारे तो नवीन गायकांना मार्गदर्शन करताना दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे का, अवधूत गुप्तेने अनेक वर्षांपूर्वी सारेगमप हिंदी या कार्यक्रमात भाग घेतला होता. प्रसिद्ध गायक सोनू निगम या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होता.

अवधूतचा सारेगमप हिंदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत बालिकावधू या चित्रपटातील बडे अच्छे लगते है गाणे तो गाताना दिसत आहे. हे गाणे तो अतिशय सुंदररित्या गात असून त्याचा आवाज ऐकून उपस्थित सगळेच मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत.

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी अवधूत गुप्ते ओळखला जातो. त्याने आजवर एकाहून एक सरस गाणी मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. 

टॅग्स :सूर नवा ध्यास नवा